लोकमत न्यूज नेटवर्कमोझरी (शेकापूर) : वर्धा ते राळेगाव मार्गावरील कानगावपासून ३ कि.मी अंतरावरील नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सदोष असल्याने चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी केली होती. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसाचे पाणी या बांधकामात शिरले असून लगतचा वळण रस्ताही वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.वर्धा ते राळेगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामात मातीमिश्रीत वाळूचा वापर होत असून या सदोष बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत असतानाही दुर्लक्षकरण्यात आले. परिणामी गुरुवारी झालेल्या पावसामुळे पुलानजिक असलेला वळणरस्ता वाहत गेला तसेच पुलाच्या अर्धवट बांधकामात पुर्ण पाणी साचले. वाहन चालकांनी तात्पुरता मार्ग काढत रस्ता धरला परंतु खोलगट भाग असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी असल्याने मालवाहू वाहन फसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालकांनी मोझरी, डौलापूर या मार्गाने वाहतूक वळविली होती. पहाटेपासून तर सकाळी ११ वाजतापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना चागलाच त्रास सहन करावा लागला.
अर्धवट पुलाच्या बांधकामात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:53 IST
वर्धा ते राळेगाव मार्गावरील कानगावपासून ३ कि.मी अंतरावरील नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सदोष असल्याने चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी केली होती. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसाचे पाणी या बांधकामात शिरले असून लगतचा वळण रस्ताही वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
अर्धवट पुलाच्या बांधकामात शिरले पाणी
ठळक मुद्देवर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प