शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५१ गावांत जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: June 7, 2015 02:22 IST

भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

६५ टक्के कामे पूर्ण : ९० कोटींच्या निधीतून केली जाताहेत कामेकारंजा (घा.) : भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यात तालुक्यातील ५१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांना प्रारंभ करण्यात आला असून यासाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.अभियानातील प्रस्तावित कामे कृषी विभाग, लघुसिंचन जि.प., राज्य लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती व सामाजिक संस्था या सात यंत्रणेमार्फत नि:शुल्क केली जाणार आहे. निवड झालेल्या ५१ पैकी ४१ गावांत तालुका कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण, धाडीचे बांध, सिमेंट बंधारे, गॅबीयन बंधारे आदी कामे फेबु्रवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. यात ३३ शेततळे असून २७ कामे पूर्ण झालीत. ६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. १०४ धाडीच्या बांधापैकी ८७ बांध पूर्ण झाले असून १७ बांध अपूर्ण आहेत. २३ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असून एकही बंधारा पूर्ण झाला नाही. नाला खोलीकरणाची ९६ कामे सुरू असून ६६ पूर्ण झाली तर ३० अपूर्ण आहे. पाच गॅबीयन बंधाऱ्यांपैकी चार पूर्ण झाले असून एकाचे काम सुरू आहे. ५१ गावांत सुक्ष्म सिंचनाची २१० कामे पूर्ण झाली आहेत.२० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण व्हावीत, असे शासनाचे धोरण आहे; पण यंत्राची उपलब्धता, शेतकऱ्यांच्या अडचणी व कमी अवधीतील अधिक कामांमुळे ३० जूनपर्यंत कामे पूर्ण होतील, अशी माहिती जलशिवार अभियानाचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी व्ही.बी. महंत यांनी दिली. अन्य सहा यंत्रणेमार्फत कोणती कामे सुरू आहे व कामांची सद्यस्थिती काय, याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अद्याप पोहोचली नसल्याने अप्राप्त आहे. एकंदरीत ६५ टक्के कामे झाली असून ३५ टक्के कामे व्हायची आहेत. येत्या १५ दिवसांत पाऊस आला तर ही कामे कशी पूर्ण होतील, हा प्रश्नच आहेू. एकदा शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरू झाला की, आपोआपच या कामांना अडथळा निर्माण होईल. यामुळे शासनाची योजना उदीष्टाप्रत पोहचणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)