शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वर्धा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून काढला रखवालदाराचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 13:48 IST

वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून ठार केले. हे प्रकरण जादूटोण्याच्या संशयावरून घडले असे पोलीस तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्देपाच हजारात तिघांनी घेतली सुपारीइंझाळा येथील हत्येचे रहस्य उलगडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून ठार केले. हे प्रकरण जादूटोण्याच्या संशयावरून घडले असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध पोलीस घेत होते. अखेर खात्रीदायक माहितीच्या आधारे चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून केवळ पाच हजारांची सुपारी घेवून श्रावणची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.इंझाळा येथील शेतकरी मंगेश भानखेडे यांच्या शेतातील गोटफॉर्मवर बुधवारी रात्रीला काही जण आले. त्यांनी पळ काढण्यापूर्वी रखवालदार श्रावण पंधराम याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. शेतातून पळ काढताना आरोपींपैकी एक जण शेतातील विहिरीत पडला. त्याला शेतमालक मंगेश भानखेडे यांनी रखवालदार समजून विहिरीबाहेर काढले होते. परंतु, मोठ्या शिताफीने त्यानेही घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात भादंविच्या कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पुलगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते. परंतु, त्यांना यश आले नसल्याने हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी रमेश शंकर पाखरे (४०) रा. इंझाळा, ईश्वर अशोक पिंजरकर (३६), अंकुश उर्फ मोन्या विलास शेंडे (२४) दोन्ही रा. नाचणगाव आणि नाचणगाव येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तर देणारे हे संशयीत पोलिसी हिसका मिळताच बोलके झाले. शिवाय त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु. शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निदेर्शाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पंकज पवार, आशीष मोरखडे, पो.ह.वा. निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, दिनेश बोथकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर आदींनी केली.अनिकेतच्या मृत्यूस श्रावण जबाबदार ठेवला ठपकाइंझाळा येथील रमेश पाखरे याचा मुलगा अनिकेत (१८) याचा मार्च २०१८ मध्ये मृत्यू झाला. अनिकेतवर श्रावणनेच जादूटोणा केला त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. शिवाय सध्या माझ्या दुसऱ्या मुलाचीही प्रकृती ठिक नाही. त्याच्यावरही श्रावणने जादूटोणा केला. अनिकेतचा जादूटोणा करून श्रावणने बळी घेतला त्यामुळेच आपण त्याचा काटा काढल्याचा कट रचला अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याने पोलिसांना दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांड्यांची खरेदीया प्रकरणातील आरोपी ईश्वर पिंजरकर हा मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याचा साळभाऊ आहे. शिवाय मुख्य आरोपीने आपल्या साळभावाच्या मध्यस्थीने इतर तीन आरोपींना श्रावणच्या हत्येसाठी पाच हजार रुपए देण्याचे आमिष दिले. संपूर्ण नियोजन झाल्यानंतर आरोपींनी मृतकाला मारण्याकरिता नाचणगाव येथील एका हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांडा खरेदी केला. त्यानंतर श्रावणचा काटा काढण्याच्या उद्देशाने आलेल्या अल्पवयीन मुलासह इतर आरोपींना मुख्य आरोपी रमेश पाखरे यांने त्याच्या घरी आश्रय दिला होता.

टॅग्स :Murderखून