शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पुलगाव पोलिसांची वॉशआऊट मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:46 IST

पुलगाव येथून जवळच असलेल्या वायफड पारधी बेड्यावर येथे पुलगाव पोलिसांनी छापा घालून दारू साहित्य व मोहा सडवा नष्ट करण्यात आला.

ठळक मुद्देवायफड पारधी बेडा : ७३ हजारांचा मोहा सडवा केला नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आ.) : पुलगाव येथून जवळच असलेल्या वायफड पारधी बेड्यावर येथे पुलगाव पोलिसांनी छापा घालून दारू साहित्य व मोहा सडवा नष्ट करण्यात आला.आगामी होळी सण व ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांतता राहावी याकरिता पुलगाव पोलिसांनी वायफड येथील पारधी बेड्यावर छापा घातला. यावेळी वायफड पारधी बेड्यावरील लोखंडी ड्रममधील मोहा सडवा, रसायन, गावठी मोहा दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ७३ हजार ४०० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. या प्रकरणात कमलाकर बाबाराव भोसले याला अटक करण्यात आली. इतर दोन आरोपी पसार झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, सय्यद अहफाज, पोलीस उपनिरीक्षक शाही, उपनिरीक्षक मराठे, राऊत, जमादार मुजबैले, भांडारकर, बन्सोड, भोवरे, भोयर, गुजर, उईके, सहारे, सहाकाटे व इतर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. होळी सणाकरिता दारूची मोठी वाहतूक होते. पोलिसांनी या दरम्यान पोलिसांनी धडक मोहीम राबविण्याची अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे.बेड्यावर जाणारा ४५ पोती गूळ जप्तसमुद्रपूर- मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थानिक पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने घटनास्थळी सापळा रचून दोन कारवाई केल्या. या दोन्ही कारवाईत कोल्ही व गणेशपूर पारधी बेडा येथे अवैध गावठी मोहा दारूची निर्मिती करण्याकरिता कमी प्रतीच्या गुळाची पोघी घेऊन जाताना दोन जणांना अटक करण्यात आली. यावेळी दोन चारचाकी व एक मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले. मालवाहू गाडी क्र. एमएच ३२, क्यू ५२०१ मध्ये १५ पोत्यांमध्ये ७५० किलो कमी प्रतीचा गूळ व दुसऱ्या मालवाहू गाडी क्र. एमएच ३२, क्यु ५४२८ मध्ये ३० पोत्यांमध्ये १५०० किलो कमी प्रतीचा गूळ आढळून आला. हा गूळ गव्हा, कोल्ही व गणेशपूर शिवारातील पारधी बेड्यांवर मोहा दारू निर्मितीकरिता नेला जात होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही वाहनांवर कारवाई करून वाहनांसह ८ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. अंकेलाल उर्फ बंटी शरबत राऊत (५२) रा. गव्हा (कोल्ही) तह. हिंगणघाट, विक्रम महाजन शेंडे (५०) रा. संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, डी.बी. पथकाचे अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे, चालक गजानन दरणे यांनी केली.