वीज वितरणच्या अनागोंदीने वर्षभरात ५५ जणांचा बळीरूपेश खैरी ल्ल वर्धापावसाळ्याच्या दिवसात येत असलेल्या वादळात महावितरणचे खांब क्षतिग्रस्त होत अनेक ठिकाणी विजेच्या जिवंत तारा तुटून पडून असतात. या तारा दुरूस्त करण्यात महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याने त्या यमदूत ठरल्याचे घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून आले आहे. कंपनीच्या या दुर्लक्षामुळे पडून असलेल्या तारांमुळे व इतर काही अनागोंदीने गत वर्षभरात ५५ जणांचा बळी घेतला आहे तर ऐन शेतीच्या हंगामात ५७ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथे रोहित्राच्या खांबातून ओल्या असलेल्या जमिनीत विद्युत प्रवाह संचारल्याने नऊ जणांना जबर धक्का बसला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तर गिरड नजीकच्या शिवनफळ येथे झाडावर चार तोडण्याकरिता चढलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. याशिवाय शेतात पडून असलेल्या तारांच्या स्पर्शामुळे बैलांचा मृत्यू झाल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. विजेचा धक्का बसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मदत देण्याचा नियम आहे. यात यंदाच्या सत्रात कंपनीच्यावतीने प्राथमिक मदत म्हणून ४ लाख ५० हजार रुपयांची मदत दिल्याचे सांगण्यात आले आहे. जनावरांच्या वयानुसार शेतकऱ्यांना मदत ४जिल्ह्यात घडलेल्या घटनांची नोंद करून विद्युत स्पर्शाने अपघाताने जनावराचा मृत्यू झाल्यास नजीकच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता चौकशी करतो. पोलीस पंचनामा, तलाठी पंचनामा त्या भागातील लाईनमन साक्षीदारसमक्ष घटनेची पाहणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर पशुधन अधिकारी दाखला, तहसीलदार, वैद्यकीय दाखला व घटनास्थळाच्या छायाचित्रासह संपूर्ण दस्तावेज जमा करून जिल्हा कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर मृत्यू झालेल्या जनावरांच्या वयानुसार त्याची किंमत काढल्या जाते. त्याचे अधिकार जिल्हा कार्यालयातून निश्चित केल्या जाते त्यानुसार त्या शेतकऱ्यांना धनादेश दिल्या जाते. यात जास्तीत जास्त ३० हजार रुपये दिल्या जाते. महावितरणद्वारे झालेल्या अपघाताची माहिती त्या परिसरातील कार्यालयाला असते. काही त्रुटी असल्यास अर्ज येत नाही. मात्र जास्तीत जास्त प्रकरणे, जिल्हा कार्यालयातच येतात. त्या घटनेचा तपास विद्युत वितरण विभागामार्फत करून महावितरण जबाबदार आढळल्यास त्यांना धनादेश दिल्या जातो. याकरिता तहसीलदाराचा अहवाल महत्त्वाचा मानल्या जातो.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा
‘त्या’ वीज वाहिन्या ठरल्या यमदूत
By admin | Updated: July 12, 2016 02:41 IST