शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

पुलाकरिता झाडगाववासीयांनी दिला आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: July 29, 2016 02:08 IST

आदिवासीबहुल गाव असलेल्या आष्टी तालुक्यातील झाडगाव येथील नाल्यावरील पूल खचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आष्टीच्या राज्यमार्गावर सत्याग्रह साहूर : आदिवासीबहुल गाव असलेल्या आष्टी तालुक्यातील झाडगाव येथील नाल्यावरील पूल खचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाने या तुटलेल्या पुलाची दुरूस्ती केली नाही. यामुळे गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. १४ आॅगस्टपर्यंत खचलेला पुलाची दुरूस्ती झाली नाही तर मानव जोडो संघटनेच्या नेतृत्वात आष्टीच्या राज्यमार्गावर सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी कळविले आहे. टुमनी, बोरगाव, वर्धपूर, वडाळा, सत्तरपूर येथील गाकवऱ्यांना शासकीय कामासाठी दररोज आष्टी येथे यावे लागते. अर्धवट असलेल्या या पुलामुळे झाडगावच्या मुलांना आष्टीच्या शाळांमध्ये वेळेवर येता येत नाही. एसटी महामंडळाची बस रस्ता वाहून गेल्याने गावात येत नाही. संपूर्ण पहाडी भागातून जमा झालेले पाणी या नाल्यात आल्यामुळे नाल्यावरील पुल खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची खचलेल्या भागात दुरूस्ती व पुलाला कोटींग केल्यास वाहतूक सुरू होऊ शकते. आंदोलनाच्या इशाऱ्याच्या प्रतिलिपी मानव जोडो संघटनेद्वारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, खासदार, आमदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती किसना अरसड, बबन दंडाळे, दादाराव धुर्वे, कैलास घाटोळे, गजानन काटे, जनार्दन मानकर, सुभाष कोसरे, विजय घारवाडे, नागोराव शेंद्रे, अंकुश चामलाटे, प्रभाकर घारवाडो, पुरूषोत्तम वरठी, माणिक घाटवाडे, मारोती शेंद्रे यांच्यासह गावकऱ्यांनी दिली.(वार्ताहर)