शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुधाचे सूर्यबिंबावरून अधिक्रमण पाहण्याची वर्धेकरांना संधी

By admin | Updated: May 9, 2016 02:04 IST

आपल्या ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सोमवारी सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जाणार आहे. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसून येईल.

आजच योग : बहार नेचर फाऊंडेशन, अंनिस, आकाश निरीक्षण मंडळ व शिववैभवचे आयोजन वर्धा : आपल्या ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सोमवारी सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जाणार आहे. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसून येईल. यालाच शास्त्रीय भाषेत अधिक्रमण असे म्हणतात. या घटनेसबंधात विद्यार्थी व जनतेला वैज्ञानिक माहिती मिळावी व खगोल संदर्भातील अंधश्रद्धांचे निराकरण व्हावे म्हणून बहार नेचर फाउंडेशन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आकाश निरीक्षण मंडळ व शिववैभव शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिववैभव येथे एका प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.बुध हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात लहान ग्रह असून सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. तो ८८ दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याभोवती फिरत असताना काही वेळेला तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून मार्गक्रमण करताना दिसून येतो. बुधाचे हे अधिक्रमण क्वचितच पाहायला मिळणारी घटना असून सोमवारी हे अधिक्रमण पृथ्वीवासीयांना पाहता येणार आहे. वर्धेतील नागरिकांना दुपारी ४ वाजून ३२ मिनिटांपासून सूर्य मावळेपर्यंत हे अधिक्रमण दिसणार आहे. ही घटना विद्यार्थी व नागरिकांना पाहता यावी व या घटनेमागील वैज्ञानिक दृष्टीकोन समजावून घेता यावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता स्थानिक शिववैभव सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात बुधाचे अधिक्रमण म्हणजे काय ? यावर बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखडे, आकाश निरीक्षण कसे करावे ? यावर अंबेजागाई येथील खगोल अभ्यासक हेमंत धानोकर व खगोलशास्त्रासंबंधातील अंधश्रद्धा यावर आकाश निरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पंकज वंजारे मार्गदर्शन करतील. याशिवाय उपस्थितांना पडद्यावर बुधाच्या अधिक्रमणाचे दर्शनही घडेल.(प्रतिनिधी)