शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांनो, 'डिजिटल अरेस्ट' पासून वेळीच व्हा सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:37 IST

सायबर चोरट्यांची नवी शक्कल : लाखो रुपयांची होतेय फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : 'आम्ही सीबीआय विभागातून बोलत आहे, तुम्ही देशविघातक कृत्य केले आहे. कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठविले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामधून सुटका करायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपये अमुक-तमुक खात्यावर पाठवा'. असा कॉल वर्ध्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना आला असून विशेष म्हणजे बोलण्यात गुंतवून संबंधित व्यक्ती ठरलेले पैसे जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल कट करायचा नाही, अशी ताकीद दिली जाते.

एका दृष्टीने समोरच्याचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून सायबर चोरटे अवघ्या काही मिनिटांत त्याच्याकडून लाखो रुपयांची कमाई करतात. मागील वर्षभरात काही वर्धेकरांनी 'डिजिटल अरेस्ट'चा अनुभव घेतला असून, लाखो रुपये गमावले आहेत. जास्त धोका न घेता, प्रत्यक्षात कोणाला न भेटता, मुख्य म्हणजे एकाच खोलीत बसून दुसऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा उद्योग काही महिन्यांपासून सुरू झाला आहे. नागरिकच जागरूक नसल्याने सायबर चोरट्यांचे फावते आहे. अनेकांना 'समाज काय म्हणेल' आणि 'माझी अब्रू गेली तर मी इतरांना तोंड कसे दाखवू' ही चिंता नेहमी सतावत असते. त्याचाच अचूक फायदा सायबर चोरटे उचलतात. डिजिटल अरेस्ट करण्यासाठी सायबर चोरट्यांची टोळी कार्यरत असते. ही टोळी कार्यरत असते. ही टोळी पीडित व्यक्तीला फोन करून आपण पोलिस, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग किंवा लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करते. तुम्ही बेकायदेशीर वस्तू, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे कोणतेही कारण सांगून 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे समोरील व्यक्तीला सांगितले जाते. विश्वास बसण्यासाठी सोशल मीडियावरून सीबीआय किंवा तत्सम विभागाचे अटक वॉरंट पाठविले जाते. 

चोरटे फेक आयडी देखील पाठवितात. आपल्याला अटक करण्यात आल्याचे समजताच अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकते आणि ती व्यक्ती जसे सांगते तसे आपण करू लागतो. त्यामुळे कायम जागरुक राहून फसवणुकीची शंका आल्यास तातडीने सायबर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. 

घाबरू नका, तक्रार दाखल करा सायबर चोरट्यांचा ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलमार्फत तुम्हाला डिजिटल अरेस्टची भीती घातल्यास घाबरू नका, जो गुन्हा तुम्ही केलेला नाही त्यामध्ये अटक कशी होईल असा साधा प्रश्न मनाला विचारा. समोरून पैशांची मागणी केल्यास कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नका. चोरट्यांनी फेकलेल्या जाळ्यात अडकू नका. थेट सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करा

आठ महिन्यांत दहावर तक्रारी दाखलसायबर पोलिस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर सर्वांत पहिला गुन्हा 'डिजिटल अरेस्ट'चाच दाखल करण्यात आला होता. यामध्ये तक्रारदाराचे लाखो रुपये सायबर चोरट्याने चोरून नेले होते. त्यानंतर मागील आठ महिन्यांत जवळपास १० ते १२ तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भामटे यांना करतात टार्गेट... उच्चशिक्षित पिढी नवीन तंत्रज्ञानाबाबत बऱ्यापैकी जागरुक असते. त्यामुळे सायबर चोरटे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी किंवा पन्नाशीच्या पुढील वयाचे व्यापाऱ्यांना टार्गेट करतात. कारण त्यांना अद्ययावत ज्ञान नसल्याने त्यांची फसवणूक करणे सोपे होते.

टॅग्स :wardha-acवर्धाdigitalडिजिटलArrestअटक