शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याच्या तरुणाचा पराक्रम; अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखरावर रोवला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 14:57 IST

वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देवयाच्या १७ व्या वर्षी वायुसेनेत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे. त्याच्या या कार्याचा जवाहर नवोदय विद्यालयानेही सन्मान केला.

वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राकेशचे बारावी पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, सेलूकाटे येथे झाले. नवोदयमध्ये शिक्षण घेत असताना त्याची निवड २००५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय वायुसेनेत झाली. भारतीय वायुसेनेमध्ये नोकरी करीत असताना त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नंतर पर्यटनामध्ये एम.बी.ए. केले. सध्या तो भारतीय वायुसेनेमध्ये भूदल परिक्षक या पदावर कार्यरत आहे. राकेशने भारतीय वायुसेनेमार्फत हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या सहा उंच शिखरांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. हे ध्येय पूर्ण करीत असतानाच त्याला मिशन अंटार्क्टिकाची संधी चालू आली. हजारो वायुसैनिकांमधून भारतीय वायुसेनेने मिशनसाठी पाच सैनिकांची निवड केली. त्यामध्ये राकेशचा समावेश होता.

अंटार्क्टिका खंडातील सर्वाच उंच शिखर माऊंट विन्सन पादाक्रांत करण्यासाठी राकेशसह पाच सदस्यांची चमू १२ डिसेंबर २०१७ ला रवाना झाली. भारतीय वायू सेनेचे एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी या मोहिमेसाठी चमूची रवानगी केली. १६ डिसेंबर २०१७ ला चमू चिली या देशात पोहचली. चिलीच्या भारतीय राजदूत अनिता नायर यांनी १९ डिसेंबरला चढाईसाठी हिरवा झेंडा दाखवून चमूला रवाना केले. ७ हजार ७५७ मीटर उंच, उणे ३० ते उणे ५० तापमानात, हाडं गोठवणाऱ्या थंडीत चोवीस तास प्रकाशात ४० ते ५० कि़मी. वेगाने वाहणाऱ्या बर्फाच्या वादळात ४० किलो वजनाचे सामान पाठीवर बांधून दररोज ९ तास अनेक अडथळे पार करीत २६ डिसेंबरला राकेशसह पाच सदस्यीय चमूने अंटार्क्टिकाच्या सर्वात उंच शिखरावर भारताचा तिरंगा व वायुसेनेचा झंडा रोवला. मिशन पूर्ण करून ११ जानेवारीला भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयात ते दाखल झाले. तेथे वायूसेनेच्या अध्यक्षांनी राकेशसह चमूला प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मानित केले. राकेश हा नवीन म्हाडा कॉलनी, वर्धा येथे वास्तव्याला आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल