शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याचा वेदांत प्रथम,आर्वीची ऋतुजा द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

कोरोनायनामध्ये दहावीची परीक्षा आणि निकाल याबाबत सारा गोंधळच होता. परीक्षा सुरु असतानाच कोविड-१९ चा प्रकोप वाढायला लागला होता. त्यामुळे परीक्षांवर काहीसा परिणामही झाला. परीक्षा आटोपल्या पण, निकालाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उशिरा का होईना विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ आजच्या निकालातून मिळाला. पण, यावर्षीचा निकाल बघता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्यावर्षी जिल्ह्यातील १७ हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के : ऋषिकेश चौधरी तृतीय स्थानी, उत्तीर्ण होण्यामध्ये मुलीच ‘टॉप’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा असलेला दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे. यामध्ये वर्ध्यातील सुशील हिम्मतसिंगका विद्यालयाचा वेदांत मुरलीधर तळवेकर याने ९९.४० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलची ऋतुजा विलास दाऊतपुरे हिने ९८.६० टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर अग्रगामी हायस्कूल पिपरी (मेघे) येथील ऋषिकेश प्रशांत चौधरी याने ९८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या २८९ शाळांमधील १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे यावर्षी निकालाची टक्केवारी ९२.१० वर पोहोचली आहे. यावर्षी १६ हजार ८७१ विद्यार्थ्यांमध्ये ८ हजार ७७२ मुले व ८ हजार ९९ मुलींनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केला. यापैकी ८ हजार ६८३ मुले व ८ हजार ५९ मुली अशा एकूण १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ७ हजार ७७९ मुले व ७ हजार ६४० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावरुन मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.५९ तर मुलींची टक्केवारी ९४.८० असल्याने उत्तीर्ण होण्यामध्ये मुलीच ‘टॉप’ राहिल्या आहेत. शाळांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांचे कौतूक केले.निकालाची २६.६० टक्क्यांनी मुसंडीकोरोनायनामध्ये दहावीची परीक्षा आणि निकाल याबाबत सारा गोंधळच होता. परीक्षा सुरु असतानाच कोविड-१९ चा प्रकोप वाढायला लागला होता. त्यामुळे परीक्षांवर काहीसा परिणामही झाला. परीक्षा आटोपल्या पण, निकालाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उशिरा का होईना विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ आजच्या निकालातून मिळाला. पण, यावर्षीचा निकाल बघता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गेल्यावर्षी जिल्ह्यातील १७ हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १६ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ११ हजार ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ६५.५० टक्के लागला होता. मात्र, यावर्षी १६ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ हजार ४१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याची टक्केवारी ९२.१० वर पोहोचली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाने २६.६० टक्क्यांनी मुसंडी मारली आहे.वर्षभरात सहा शाळांची पडली भरजिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या घटत असतानाही शाळांची संख्या मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील २८३ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा दिली होती. यावर्षी यामध्ये सहा शाळांची भर पडली असून २८९ शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वर्धा तालुक्यामध्ये दोन, आष्टी, हिंगणघाट, कारंजा व सेलू या चार तालुक्यामध्ये प्रत्येकी एका शाळेची भर पडली आहे. तसेच बहूतांश शाळांचा उत्तम निकालही लागला आहेत.पुलगावच्या न.प. शाळेला भोपळाजिल्ह्यातील आठही तालुक्यातील २८९ शाळांतील विद्यार्थ्यांनी परीक्षा देत शाळांचेही नावलौकीक केले आहे. यामध्ये तब्बल ६७ शाळांतील निकाल शतप्रतिशत लागला आहे. यामध्ये वर्धा तालुक्यातील २६, आष्टी तालुक्यातील २, कारंजा येथील ६, आर्वी १०, हिंगणघाट ११, देवळी ५, समुद्रपूर ६ व सेलू तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. तर देवळी तालुक्यातील पुलगाव येथील नगर पालिकेच्या शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.वेदांतची खेळासोबतच गुणवत्तेतही भरारीवर्धा : जिल्ह्यातून प्रथम आलेला वेदांत मुरलीधर तळवेकर हा थ्रो बॉलचा राष्ट्रीय खेळाडू असून त्याने २०१८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला आहे. त्याचे वडील मुरलीधर आणि आई अर्चना हे दोघेही पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याची मोठी बहिण वैद्यकीय शिक्षण घेत असून वेदांतलाही डॉक्टर होऊन समाजसेवा करायची आहे. अभ्यासातील नियमितता, गुरुजणांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश गाठता आले, असे वेदांतने लोकमतशी बोलताना सांगितले. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, बहिण व गुरुजणांना दिले. त्याच्या या यशाबद्दल सुशील हिम्मतसिंगका विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र धर्माळे, पर्यवेक्षक पद्मा तायडे व शिक्षकांनी कौतुक केले.ऋतुजाला जायचंय प्रशासकीय सेवेतआर्वी : जिल्ह्यातून दुसऱ्यास्थानी असलेल्या ऋतुजा विलास दाऊतपुरे हिने स्पर्धा परिक्षेचा सराव करुन प्रशासकीय सेवेत जाण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. ऋतुजाचे वडील आर्वी येथील विद्युत वितरण कंपनीमध्ये सिनियर ऑपरेटर म्हणून कार्यरत असून आई गृहीणी आहे. नियमित पाच ते सहा तास अभ्यास करुन अवघड असलेल्या विषयांची वारंवार उजळणी केली. त्यासोबतच आई-वडीलांनी अभ्यासाकरिता नेहमीच प्रोत्साहन दिले, त्यामुळे आज दहावीत यशस्वी झाल्याचे मत ऋतुजाने लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले असून तिच्या यशाबद्दल विद्यानिकेतन इग्लिश हायस्कूलच्या प्राचार्य नीलिमा वडणारे, सचिव नितीन वडणारे व शिक्षकांनी घरी जाऊन तिचे कौतुक केले.ऋषिकेशला व्हायचंय अभियंतावर्धा : शहरातील पिपरी (मेघे) येथील अग्रगामी विद्यालयाचा ऋषिकेश प्रशांत चौधरी यांने जिल्ह्यातून तिसरे स्थान मिळविले आहे. मराठी व संस्कृत विषय अवघड जात असल्याने त्या विषयांवर भर देत ‘बेस्ट फाईव्ह’ हे टार्गेट ठेवले परिणामी हे यश मिळाले. आता या पुढेही आणखी जोमाने अभ्यास करुन अभियंता होण्याचे स्वप्न साकार करायचे आहे, असे ऋषिकेशने सांगितले. त्याचे वडील वडद येथील शाळेमध्ये शिक्षक असून आई आरती गृहिणी आहे. राधेय हा त्याचा धाकटा भाऊ असून तो पाचव्या वर्गामध्ये शिकत आहे. शाळा, शिकवणी आणि गृहपाठ यासर्वांमध्ये नियमितपणा कायम ठेवत दररोज चार ते पाच तास अभ्यास केल्याचेही त्याने सांगितले. त्याच्या या यशाबद्दल अग्रगामी शाळेच्या प्राचार्यासह शिक्षकांनी कौतुक केले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल