शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

लाळखुरकुत लसीकरणात ‘वर्धा’ द्वितीय स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 11:44 PM

जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणाऱ्या ‘लाळखुरकुत’ या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. जनावरांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाने सध्या राज्यात १४ वी तर देशात २५ वी लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

ठळक मुद्देविदर्भाची स्थिती : ६३.०६ टक्के झाले काम

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणाऱ्या ‘लाळखुरकुत’ या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. जनावरांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाने सध्या राज्यात १४ वी तर देशात २५ वी लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम २० मे पर्यंत राबविली जाणार असून या मोहिमेत दरम्यान उल्लेखनिय कार्य करीत वर्धा जिल्ह्याने विदर्भात द्वितीय स्थान पटकाविले आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात सदर लसीकरणाचे काम ६३.०६ टक्के झाले आहे.लाळखुरकुत हा आजार विषाणू जन्य असून या आजाराची लागण झालेल्या जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी होते. हा आजार पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा असल्याने त्याला आळा घालणे शासनाच्या विचाराधीन आहे. त्याच अनुषंगाने सध्या लाळखुरकुतची प्रतिबंधात्मक लस गाय व म्हैस वर्गीय जनावरांना दिली जात आहे. वर्धा जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ७२ पशुधन आहे.ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याला ३ लाख ५० हजार ५०० लस मात्रा प्राप्त झाली. सध्या हिच प्रतिबंधात्मक लस जनावरांना दिली जात आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील एकूण २ लाख १५ हजार ६५७ गाय व म्हैस वर्गीय जनावरांना ही लस देण्यात आली आहे. तर विदर्भात अव्वल असलेल्या गोंदीया जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ६४६ पशुधनापैकी २ लाख ७४ हजार ९२३ जनावरांना लाळखुरकुतीची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. रोग अन्वेशन विभाग पुणेचे उपायुक्त डॉ. पी.आर. महाजन, नागपूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहा. आयुक्त किशोर कुमरे यांच्या मार्गदर्शनात सध्यास्थितीत गोंदीया जिल्ह्याने लसीकरण मोहिमेचे ६७ टक्के तर वर्धा जिल्ह्याने ६३.०६ टक्के काम झाल्याचे सांगण्यात आले.लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत गोंदिया प्रथम तर वर्धा विदर्भात द्वितीय स्थानी आहे. सध्या जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातून गाय व म्हैस वर्गीय जनावरांना नाममात्र शुल्कावर लाळखुरकुतीची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. ही मोहीम २१ मे पर्यंत सुरू राहणार असून याचा लाभ पशुपालकांनी घ्यावा.- प्रज्ञा गुल्हाणे, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.