शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

वर्धा न.प.चा ८७ कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 3, 2016 02:13 IST

विकासाच्या कामात मागे पडलेल्या वर्धा नगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर झाल्याचे दिसून येते.

२६ लाख शिल्लक राहणार असल्याचा अंदाजवर्धा : विकासाच्या कामात मागे पडलेल्या वर्धा नगर पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर झाल्याचे दिसून येते. ८७ कोटी २५ लाख रूपयांचे हे अंदाजपत्रक असून यामध्ये खर्च जाता २६ लाख रूपये शिल्लक राहणार आहे. पालिकेच्या अण्णाभाऊ साठे सभागृहात २९ फेबु्रवारी २०१६ रोजी वर्धा नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांनी नगर परिषदेचा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षांचा अनुमानित अर्थसंकल्प सादर केला. लेखापाल अशोक वाघ यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. प्रस्तावित बजेटमध्ये ८७.२७ कोटी रूपये खर्च होणार असून अंतिम शिल्लक २६ लाख राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बजेटसंदर्भात न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी सविस्तर माहिती दिली. नगरोत्थान योजनेंतर्गत विकासाची कामे करण्याच्या दृष्टीने प्रत्येक नगरसेवकांचे ५ लाख रुपयेप्रमाणे ४३ वॉर्डातील कामासाठी २ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेचे विविध उत्पन्नाचे स्त्रोत व शासनाच्या प्राप्त अनुदानानुसार एकंदर ४१.३७ कोटी रुपये प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. तसेच अपंग कल्याणाकरिता, मागासवर्गीय, दलित, अनुसूचित जातीसाठी घरकुल बांधकामसाठी तरतूद करण्यात आली आहे. अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा, भुयारी गटारे, आणि उद्यान विकासाच्या कामासाठी वर्धा न.प.ल एकंदर ३५.३० कोटींचा निधी मंजूर केला आहे.(शहर प्रतिनिधी)