शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वर्धा-नागपूर महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

ठळक मुद्देकेंद्र शासनाने तिन्ही कायदे रद्द करण्याची रेटली मागणी : पवनारात दोन्ही बाजूने लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/पवनार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोनाला पाठिंबा देत, विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी, तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येत, शनिवारी दुपारी वर्धा-नागपूर महामार्गावरील पवनार येथे रास्तारोको आंदोलन केले. केंद्र शासनाने शेतकऱ्यांशी निगडित तिन्ही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू राहिल्याने वर्धा-नागपूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, गोपाल दुधाने, विठ्ठल झाडे, प्रफुल्ल कुकडे, माकपचे राज्य सचिव यशवंत झाडे, संजय भगत, समीर बोरकर, प्रभाकर धवने, भैय्या देशकर, दुर्गा काकडे, अर्चना घोघरे, आशा ईखार, रामभाऊ ठवरी, काँग्रेसचे मनोज चांदुरकर, सुधीर पांगुळ, अविनाश सेलुकर, पंकज इंगोले, मिलिंद मोहोड, अभिजीत चौधरी, आपचे प्रमोद भोमले, नितीन झाडे, मंगेश शेंडे, तुळशीराम वाघमारे, मनोज तायडे, महेंद्र मुनेश्वर, प्रभाकर चोंदे, निरज गुजर, मनोज कांबळे, पंकज सत्यकार, अस्लम पठाण, प्रसाद बागवे, राकाँचे ॲड.मिलिंद हिवलेकर, संजय काकडे, संदीप किटे, प्रवीण काटकर, योगेश घोगरे, पराग खंगार, ॲड.पूजा जाधव, श्रेया गोडे, जगदीश डोळसकर, गजेंद्र सुरकार, दिवाकर शंभरकर, सुरेश बोरकर, दिलीप मसराम, मधुकर भोयर, सुमेर ठाकूर, पवन दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.  

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्धआंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेले. तेथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.पोलिसांची दमछाकआंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीतपवनार येथील रास्तारोको आंदोलनामुळे पवनार ते वर्धा तर पवनार ते सेलू या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल अर्धातासांचा कालावधी लागला, हे विशेष.

आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसादशनिवारी जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पंत.) हिंगणघाट, वायगाव, धोत्रा चौरस्ता आदी ठिकाणी शेतकरी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह डाव्या पक्षांनी रस्ता राेको आंदोलन केले. याला शेतकरी व शेतमजूरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप