शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

वर्धा मुख्यालयाला सर्वसाधारण जेतेपद

By admin | Updated: August 28, 2016 00:32 IST

जिल्हा पोलीस विभागाच्या गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालयाने सर्वसाधारण जेतेपद पटकाविले

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता : तीन दिवस विविध खेळवर्धा : जिल्हा पोलीस विभागाच्या गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालयाने सर्वसाधारण जेतेपद पटकाविले. पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानात जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी चमू नागपूर येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यावेळी मंचावर अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक (गृह) रवीं किल्लेकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी पोलीस विभागाकडून मानवंदना देण्यात आली. यानंतर महिला व पुरूषांची १०० मीटर दौड स्पर्धा झाली. यात महिलांमध्ये प्रथम स्थान वर्धा विभागाच्या शाहीन सैयद तर द्वितीय स्थान मुख्यालयाच्या पुजा गिरडकर यांनी पटकावले. पुरूषांमध्ये प्रथम स्थान मुख्यालयाचे योगेश ब्राह्मणे तर द्वितीय स्थान तुषार इंगळे याने पटकावले. स्पर्धेतील बेस्ट अ‍ॅथलिट पुरस्कार पुरूष गटात वर्धा विभागाचे सूरज जाधव तर महिला गटात बेस्ट शाहीन सैयद यांना देण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकरिता सुद्धा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.राखीव पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर ठवरे यांच्या नेतृत्वात पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील चारही उपविभागातील खेळाडूंनी पथसंचलन केले. अध्यक्षीय भाषणात पोलीस अधक्षीक गोयल यांनी सर्व खेळाडूंना समन्वय साधण्यासाठी खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे, असे सांगितले. अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांनी या स्पर्धेत ज्यांना यशाने हुलकावणी दिली त्यांनी खचून न जाता जिद्दीने व नव्या उमेदीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. तसेच पुढे होणाऱ्या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील तमाम खेळाडूंनी प्रयत्न करून यशाचे शिखर गाठावे, असे सांगितले. या कार्यक्रमाला सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. क्रीडा स्पर्धा स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नागपूर परीक्षेत्राचे सहायक टीम मॅनेजर पोलीस उपनिरीक्षक राजेश उमरे, जिल्हा खेळप्रमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी सहकार्य केले. संचालन डॉ. अजय येते यांनी तर उपस्थितांचे आभार आर.जी. किल्लेकर यांनी मानले.(प्रतिनिधी)