शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पॉस मशीनमधील त्रुटींमुळे स्वस्त धान्याचे लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:14 IST

घोरड येथे स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मशीनमुळे अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे.

ठळक मुद्देआधार कार्ड क्रमांक दाबताच व्यक्तीच्या नावात होतो बदलकाहींच्या अंगठ्याचे ठसेच जुळत नाहीत

विजय माहुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: घोरड येथे स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मशीनमुळे अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे.आधार कार्ड क्रमांक दाबताच काही व्यक्तींच्या नावात बदल झाल्या कारणाखातर तर काहीचे अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना माघारी फिरत परतावे लागत आहेया चुकांच्या दुरुस्तीसाठी या शिधापत्रिकाधारकास तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. या मशीनवर नोंद करण्यासाठी लागणारा वेळ पाहता संपूर्ण दिवस वाया घालवावा लागत आहे. शासनाने खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळावे म्हणून सुविधा केली असली तरी ग्राहकांची मात्र डोकेदुखी वाढविली आहेत्यातच काही महिन्यांपूर्वी शिधा पत्रिका असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी एका पत्रिकेऐवजी निरनिराळ््या शिधापत्रिका बनविल्या. अशा नवीन शिधा पत्रिकाधारकांना गत ८/१० महिन्यांपासून धान्य मिळत नाही. त्या नवीन शिधा पत्रिका तहसील कार्यालयातून लिंक करण्यात आल्या नसल्याचे कारण सांगितले जात आहे ही समस्या कोणत्या एका गावापुरती नसून संपूर्ण तालुक्यात असल्याने अनेक परिवार स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत.पॉसमशीनची परिपूर्ण माहिती नसल्याने ग्राहकांचा वेळही वाया जातो आहे. या समस्येवर तातडीने दुसरा पर्याय शोधण्याची गरज असल्याचे मत नागरिकांत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार