शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४ ठिकाणांहून होणार वर्धा शहर नजरकैद

By admin | Updated: February 7, 2017 01:09 IST

शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

नवे खांब, नवी कंट्रोल रूम : १५ दिवसात होणार काम पूर्णवर्धा : शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते औटघकेचे ठरले. यामुळे नवे कॅमेरे लावण्याचा निर्णय झाला. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून १ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले. त्याचे टेंडरींग होवून कामाला प्रारंभ झाला आहे. मिळालेल्या रकमेत शहरातील १४ ठिकाणी तब्बल ४८ कॅमेरे लागणार आहेत. काम पूर्णत्वास जात असून या कॅमेऱ्यातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. पूर्वी शहरात असलेल्या वाहतूक नियंत्रक दिवे असलेल्या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र गत काही दिवसांपासून शहरातील सिग्नल बंद असल्याने लाल, हिरव्या आणि पिवळ्या दिव्यांसह त्यांचे खांबही बेपत्ता झाले आहेत. यामुळे कॅमेरे लावण्याकरिता निवड झालेल्या चौकाचा सर्व्हे करून जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर नवे खांब उभारून त्यावर लाभ होणाऱ्या दिशेने कॅमेरे लावण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यात त्या भागात होणाऱ्या सर्वच हालचाली कैद होणार आहे. शहरात हे कॅमेरे लावण्याचा कंत्राट मुंबई येथील एका कंपनीला दिला आहे. कॅमेरे लावण्याचे काम ९० दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दिलेल्या कालावधीनुसार काम पूर्णत्त्वास येत असून येत्या १५ दिवसांत हे कॅमेरे शहरातील प्रत्येक हालचाली टिपणार आहेत. या हालाचाली थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कैद होणार आहे. त्याकरिता एक विशेष कक्ष निर्माण करण्यात येत आहे. या कक्षातून हे कॅमेरे हँडलिंग होणार आहेत.(प्रतिनिधी) नव्या नियमामुळे हिंगणघाट येथील काम रखडले वर्धेप्रमाणे हिंगणघाट शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार होते. तसा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र या संदर्भात शासनाने काही नव्या सूचना जारी केल्याने ते काम रखडले आहे. आता नव्या निर्देशानुसार प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.जिल्हा अधीक्षक कार्यालयातून नियंत्रणशहरात लावण्यात येणार असलेल्या कॅमेऱ्यांची व्यवस्था त्यातील महत्त्वाची चित्रे गोळा करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालात विशेष कक्ष सुरू करण्यात येत आहे. त्याचे कामही पूर्णत्त्वास येत आहे. ३० लाखांचे टेंडरिंग बाकी वर्धा शहरात कॅमेरे लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने १ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले होते. यातील १ कोटी रुपयांचे टेंडरींग झाले असून ३० लाख रुपयांचे टेंडरींग बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ३० लाख रुपयांचा विचार करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे. शहरात सुरू होणाऱ्या सीसीटीव्हीचे काम प्रगतिपथावर आहे. कॅमेरे लावण्याचे काम मुंबई येथील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यानुसार त्याच्याकडून काम सुरू असून ते येत्या १५ दिवसात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कॅमेरे हँडलींग करण्याकरिता एसपी कार्यालयात एक अद्ययावत कंट्रोल रूम तयार करण्यात येत आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक़