शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा अन् आर्वीत अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:51 IST

साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देशासन धोरणांचा निषेध : विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी : साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते.साहेबराव करपे व मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या चार मुलाबाळांसह पवनारजवळील दत्तपूर येथे आत्महत्या केली होती. ही देशातील शेतकऱ्याची पहिली आत्महत्या असून या देशाचे नागरिक म्हणून आत्महत्या केलेल्या असंख्य शेतकरी बांधवांप्रती आदर आणि आपले सामाजिक दायित्व समजून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन या दिवशी किसानपुत्रांकडून केले जाते. या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून वर्ध्यात डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील हुतात्मा स्मारक येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा येथील आंदोलनात सुधीर पांगूळ, प्रशांत देशमुख, विशाल चौधरी, राजेश धोबे, मिलिंद मोहोड, विशाल हजारे, अनिकेत भोयर, अ‍ॅड. दिनेश शर्मा, माधुरी पाझारे, स्वाती देशमुख, दीप्ती रघाटाटे, शनकर देशमुख, संदीप दहीगावकर, गिरजा राऊत तर आर्वी येथे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष वीरेंद्र कडू, सुरेंद्र जाणे, बाळा जगताप, प्रशांत ढवळे, राजेश सोळंकी, संतोष डंभारे, प्रफुल्ल क्षीरसागर, चंद्रशेखर हिवाळे, रवींद्र घाडगे, नरेश निनावे, शुभम राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या शुभांगी डंभारे, सीमा साळुंखे, अलका कहारे, शुभांगी गाठे, काळमोरे, माजी जि. प. सदस्य गजाननन गावंडे आदी आंदोलनात सहभागी झालेत. निंबू सरबत देऊन उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची सांगता झाली.

टॅग्स :Strikeसंप