शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा आगाराची बससेवा दहा तास ठप्प

By admin | Updated: March 23, 2017 00:40 IST

बस थांबवून ठेवण्याच्या कारणातून चालकास मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कानगाव नजीकच्या गाडेगाव येथे घडली.

चालकाला मारहाणीचा निषेध : आरोपीला अटक करण्याची वाहक-चालकांची मागणी वर्धा : बस थांबवून ठेवण्याच्या कारणातून चालकास मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कानगाव नजीकच्या गाडेगाव येथे घडली. या घटनेचा निषेध नोंदवित बुधवारी पहाटे ५ वाजतापासूनच चालक, वाहक व रापमच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. परिणामी, तब्बल दहा तास बससेवा ठप्प होती. आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. दुपारी ३.३० वाजता रापम अधिकाऱ्यांची यशस्वी मध्यस्थी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनावर संप मागे घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वर्धा आगारात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संपाची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर पोलीस ताफ्यासह दाखल झाले. शिवाय अल्लीपूरचे ठाणेदार भानुदास पिदुरकरही कर्मचाऱ्यांसह पोहोचले. पोलिसांच्या उपस्थितीत विभागीय नियंत्रकांकडून यंत्र अभियंता, विभागीय वाहतूक अधिकारी सुतवणे, विभागीय सांखिकी अधिकारी देवपुजारी, विभागीय वाहतूक अधीक्षक वाडीभस्मे, वर्धा आगार व्यवस्थापक वाय. एम. राठोड तथा सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा कर्मचारी यांच्यात चर्चा झाली; पण आरोपीला अटक करण्याच्या मागणीवर कर्मचारी अडल्याने ३ वाजेपर्यंत तोडगा निघाला नाही. परिणामी, बसस्थानकात प्रवाशांची गर्दी व बसेसचा अभाव होता. दुपारी ३.३० वाजता पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मंगळवारी वर्धा ते गाडेगाव बस क्र. एमएच ४० वाय ५३६८ ही गाडेगाव येथे पोहोचली. या बसवर चालक रामचंद्र उईके व वाहक लक्ष्मण तडसे हे होते. बसमध्ये एक नातलग असून त्यांचे काही साहित्य घरी राहिले, असे सांगत सायंकाळी ५.३० वाजता राजू गिरी याने बस थांबवून ठेवण्यास सांगितले. बराच वेळ लोटूनही सदर नातलगाचे साहित्य देण्यासाठी गिरी आलेच नाही. यामुळे बस व प्रवाशांना विलंब होत असल्याने चालक उईके यांनी बसचा पुढील प्रवास सुरू केला. दरम्यान, बस गावापाूसन एक किमी अंतरावर पोहोचली असता राजू गिरी व अन्य दोघांनी एका दुचाकीने पोहोचून बस अडविली. यानंतर गिरी यांनी वाद घालत चालक उईके यांना जबर मारहाण केली. या घटनेमुळे चालक व वाहकांमध्ये असंतोष पसरला होता. या प्रकरणी मंगळवारी रात्री अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. उईके यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली; पण अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अचानक संपाचे अस्त्र उगारले. महत् प्रयत्नांनी ३.३० वाजता तोडगा निघाल्यानंतर बससेवा सुरू करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी) विद्यार्थी, प्रवाशांना फटका बसस्थानकावर बसेस उभ्या आहेत; पण चालक, वाहक बस काढत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सध्या दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे; पण आज बसेसच गावांत न पोहोचल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना अन्य वाहनांनी परीक्षा केंद्र गाठावे लागले. ग्रामीण नागरिक व दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गालाही दुसऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागला. डिझेल भरण्याच्या नावावर बसेस केल्या आगारात जमा दुपारी १२ वाजता शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, बसस्थानक व्यवस्थापक तथा अन्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना समजावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. बसस्थानकावर असलेल्या काही बसेस गंतव्य स्थळी रवाना झाल्या; पण बहुतांश बसेस डिझेल भरण्याच्या नावावर वर्धा आगारात नेऊन उभ्या करण्यात आल्या. शिवाय संपूर्ण कर्मचाऱ्यांनीही आगारात पोहोचून संपात सहभाग घेतला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजय मगर, रापमचे अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण दुपारी ३ वाजेपर्यंत तोडगा निघालेला नव्हता. यामुळे दुपारपर्यंत बससेवा ठप्प झाली होती.