शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

वर्धेत ५७,८३८ वीजग्राहकांकडे थकले २०.७४ कोटी

By admin | Updated: November 6, 2016 00:39 IST

वीज देयकाचा भरणा केला नसल्याने महावितरणच्यावतीने अनेकांची जोडणी कापली आहे.

महावितरणची ‘थकबाकीमुक्ती योजना’: थकबाकी व कायमस्वरूपी वीज कापलेल्या ग्राहकांना लाभ रूपेश खैरी  वर्धावीज देयकाचा भरणा केला नसल्याने महावितरणच्यावतीने अनेकांची जोडणी कापली आहे. अशा कायमस्वरूपी जोडण्या कापलेले वर्धेत ५७ हजार ८३८ ग्राहक आहेत. या ग्राहकांवर आजस्थितीत २० कोटी ७४ लाख ३६ हजार ७५९ रुपयांची थकबाकी आहे. यात ३ कोटी १० लाख ३३ हजार ६४० रुपये निव्वळ व्याज आहे. तर मूळ थकबाकी १७ कोटी ६४ लाख ३ हजार ११८ कोटी रुपये आहे. या थकीत रकमेमुळे महावितरणला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे ही रक्कम वसूल करण्याकरिता महावितरणच्यावतीने थकबाकी मुक्ती योजना राबविण्यात येत आहे. या थकबाकीत घरगुती ग्राहकांसह शासकीय, व्यावसायिक, कारखानदार, पथदिवे आदी जोडणी कापणीचा समावेश आहे. वीज पुरवठा कापूनही थकबाकीदरांकडून ही ती भरण्यात आली नाही. ही थकबाकी भरण्याकडे संबंधितांकडून कानाडोळा होत असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता महावितरणच्यावतीने थकबाकीमुक्ती योजना कार्यान्वित केली आहे. या थकित वीज देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब थकबाकीदार वीजग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या योजनेत ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी पंपधारक व सार्वजनिक नळ योजना ग्राहक वगळून उर्वरित उच्च व लघुदाब वीजग्राहकांना सहभागी होता येणार आहे.थकबाकीत केवळ घरगुती ग्राहक नाही तर शासकीय, कारखानदार व व्यावसायिक ग्राहकही आहेत. थकबाकी असलेल्या या ग्राहकांना कंपनीच्यावतीने अनेक वेळा नोटीसी बजावल्या; पण त्याचा काही लाभ झाला नाही. यामुळे ही योजना अंमलात आणल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेत किती रुपयांची थकबाकी वसूल होईल, हे योजनेचा कालावधी संपल्यानंतरच उघड होणार आहे. योजनेची वैशिष्टे थकबाकी मुक्ती योजनेत ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत जे थकबाकीदार ग्राहक संपूर्ण मूळ थकबाकीचा भरणा करतील, त्यांना मूळ थकबाकीमधील रकमेत पाच टक्के सुट मिळणार आहे, तर व्याजाची व विलंब आकाराची संपूर्ण रक्कम माफ होणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी २०१७ पूर्वी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची संपूर्ण रक्कम माफ होणार आहे. तर ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे.मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाईन सोय व संबंधित ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडल कार्यालयामधून संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार असल्याचे नमूद आहे.