शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

प्रभाग तीन, चार केला स्वच्छ

By admin | Updated: June 26, 2017 00:38 IST

शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी युवा परिवर्तन

युवा परिवर्तनचे आंदोलन : न.प.च्या स्वच्छता अभियानाची पोलखोल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज या संघटनेकडून स्वच्छता आंदोलन केले जाते. या ंअंतर्गत शहरातील विविध प्रभागात प्रत्येक शनिवार व रविवारी संघटनेचे कार्यकर्ते स्वच्छता करतात. याच आंदोलना अंतर्गत शनिवारला प्रभाग क्रमांक तीन तर रविवारी प्रभाग क्रमांक चार येथे गांधीगिरीचा अवलंब करीत युवकांनी स्वच्छता करुन पालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल केली. या आंदोलनात प्रभाग क्रमांक तीनमधील तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्यात आल्या. तसेच ठिकठिकाणी पडून असलेला कचरा आदोलनकर्त्यांनी गोळा केला. यानंतर संपूर्ण प्रभागातील कचरा संकलीत करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली. पालिका प्रशासनाकडून प्रत्येक वॉर्डात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रभागातील परिस्थिती भिन्न असल्याचे या आंदोलनातून दिसून आले. त्यामुळे पालिकेने राबविलेल्या स्वच्छता अभियानाची पोलखोल झाली. या भागातील बहुतांश नाल्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ होणे क्रमप्राप्त होते. मात्र, नाल्या स्वच्छ न करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी घरात शिरण्याचा धोका आहे. युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत आंदोलनादरम्यान परिसरातील तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करुन वाहत्या केल्या. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, धरम शेंडे, साहिल नाडे, शुभम कुरील, शैलेश पंचेश्वर, जयंती मिश्रा, रागिनी शर्मा, प्रगती देशकर, स्रेहा वैरागडे, सुरभी चनप, सोनाली डायरकर यांचा सहभाग होता. कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा प्रभाग क्रमांक चार मधील इसाजी ले-आऊट, आरती टॉकीज चौक येथील कचरा युवकांनी गोळा करुन विल्हेवाट लावली. यानंतर नागरिकांनी समस्या मांडल्या. रहिवाशांनी पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाबाबत रोष व्यक्त केला. घंटा गाडीकरिता पालिकेकडून शुल्क आकारण्यात येत असले तरी नियमीत कचरा उचलण्यात येत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो.