शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रासाठी भटकंती

By admin | Updated: July 12, 2014 01:41 IST

विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता लागणारे जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे.

सेलू : विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता लागणारे जात प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. या विद्यार्थ्यांना आर्थिक विचंबना सहन करीत व्याजाने पैसे घेऊन दंड भरावा लागत आहे. सेलू तहसील कार्यालयातील विविधामधील कर्मचारी विद्यार्थ्यांकडून जातीच्या दाखल्याचे कागदपत्र तयार करण्याकरिता अतोनात पैसे घेत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता लागणारा जातीचा दाखला वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापाूसन वंचित रहावे लागत आहे. जातीचा दाखल न मिळाल्याने अनेकांना अभियांत्रिकेच्या प्रवेशाकरिता कागदपत्र पडताळणीच्यावेळी एका दिवसाकरिता ५०० रुपये दंड भरावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. साबतच विद्यार्थ्यांना आर्थिक त्रासही सहन करत व्याजाने पैसे घेवून दंड भरावा लागत आहे. सेलू तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना गत एक ते दीड महिन्यापासून जातीचे दाखले अजूनही मिळाले नाही. जातीचा दाखला तयार झाला की नाही याबाबत चौकशी करण्याकरिता विद्यार्थी गेले असता विविधाचे कर्मचारी विद्यार्थ्यांना साहेबांची सही व्हायची आहे, आम्ही पूर्ण केसेस पाठविलेल्या आहे, तुम्ही उपविभागीय कार्यालयात लावून चौकशी करा अशी एका ना अनेक उत्तरे विद्यार्थीना देतात. वास्तविकतेत ते प्रकरण त्यांच्याच कार्यालयात असते. त्यांना पैसे दिल्या जात नसल्याने ते दिल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास देतात आसा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.तहसील कार्यालयाच्या विविधामधील कर्मचारी विद्यार्थ्यांकडून जातीचे दाखल्याचे निवेदन तयार करून देण्यासाठी अतोनात पैसे उकळत आहेत. उका दाखल्याकरिता बनविण्याकरिता ५०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत. जे पैसे देतात त्यांना पाच दिवसात जातीचा दाखला मिळतो. पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना २० ते २५ दिवस होवूनही दाखला मिळत नाही. हा भोंगळ कारभार अनेक दिवसापासून सुरू आहे. या कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना १० दिवसाच्या आत जातीचे दाखले त्वरीत न मिळाल्यास व सेलू तहसील कार्यालयामधील विविधाच्या कर्मचाऱ्यांच्या भोंगाळ कारभाराची चौकशी करून तो भोंगळ कारभार बंद करण्यात यावा अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यावेळी दिला. शिष्टमंडळात मनविसेचे शुभम दांडेकर, राहूल सोरटे, बबलू बोरकर, करण पाठक, सोनू लांजेवार, सर्कल अध्यक्ष सुरज ठोंबरे, राहूल जाधव, सागर करनाके, लोकेश ठोंबरे, प्रविण शिंदे, विशाल भुरे, आदित्य धवणे, भुषण बोरकर, नितीन देवरे, रजत महाडोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)