शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखविल्या जाताहेत वाकुल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

शनिवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता विभाग नियंत्रकांच्या दालनासमोरच ‘मास्क व सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करू नये' असा सूचनाफलक दिसून आला; पण प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयातही मास्कचा वापर करावा, या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखी सूचनेकडे पाठच दाखविली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला वेळीच ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काही मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांना दिल्या आहेत. त्याबाबतचा लेखी आदेशही या कार्यालयांना पाठविण्यात आला आहे; पण याच आदेशातील महत्त्वपूर्ण मास्क क्रमप्राप्तच्या सूचनेकडे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पाठ दाखविण्यातच धन्यता मानत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात सुमारे १२५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सुरुवातीला या कार्यालयातील काही कर्मचारीही कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते; पण नंतर हळूहळू निम्म्याहून अधिक कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने सध्या या कार्यालयात बऱ्यापैकी मनुष्यबळ आहे. शनिवारी या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता विभाग नियंत्रकांच्या दालनासमोरच ‘मास्क व सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करू नये' असा सूचनाफलक दिसून आला; पण प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयातही मास्कचा वापर करावा, या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखी सूचनेकडे पाठच दाखविली जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्यामुळे रापमंच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काेरोनाची भीती नाही काय, असा प्रश्न येथे विविध कामानिमित्त येणाऱ्यांना पडत आहे.

दंडात्मक कारवाई करणार कोण?-    कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या खबरदारीच्या सूचनांकडे पाठ दाखविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत; पण रापमंच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करणार कोण, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या