शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी रोडवर यमराज करतोय प्रतीक्षा!

By admin | Updated: February 11, 2017 00:55 IST

शहरातील विविध मार्गांपैकी महत्त्वाचा महामार्ग म्हणून नालवाडी चौक ते विश्रामगृह चौक हा व्हीआयपी मार्ग आहे.

मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे : वाहनचालकांना नाहक त्रास वर्धा : शहरातील विविध मार्गांपैकी महत्त्वाचा महामार्ग म्हणून नालवाडी चौक ते विश्रामगृह चौक हा व्हीआयपी मार्ग आहे. परंतु, याच मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावरील जीवघेणे खड्डे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्याकडे संबंधीतांचेही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे. सेवाग्रामकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने वगळता दुचाकी व चारचाकी छोटी वाहने स्थानिक विश्रामगृह चौकातून वळण घेत नालवाडी चौक होत पुढील प्रवासाकरिता रवाना होतात. विश्रामगृह ते नालवाडी चौक या मार्गाला व्हीआयपी मार्ग म्हणून ओळख असली तरी याच मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील काही ठिकाणीची गिट्टी उघडी पडली आहे. तर काही परिसरात गिट्टीची चुरी पडून आल्याने सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या मार्गावरून जड वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, रस्त्यावर असलेले ठिकठिकानचे खोल खड्डे इतरांच्या जीवीतास धोकादायक ठरत आहे. रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचे अनेक उदाहरणे असून अनेकांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करूनच पुढील प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरील खोल खड्डे सहज दिसून येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे परिसरातील नागरिकांसह वाहनचालक मेटाकुटीस आले आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नालवाडी चौक ते विश्रामगृह चौक या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)