शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

एका परिपूर्ण उद्यानाची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: March 20, 2017 00:47 IST

हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे.

आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी महावीर उद्यान झाले खुले वर्धा : हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. शनिवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत हे उद्यान लोकांसाठी खुले करण्यात आले. व्यासपीठावर खा. रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, पालिकेच्या शिक्षण सभापती श्रेया देशमुख, पाणी पुरवठा सभापती सुमित्रा कोपरे, नगर सेविका शुभांगी कोलते, रंजना पट्टेवार, वंदना भुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना खा. तडस यांनी केंद्र व राज्य सरकार शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कटीबद्ध आहे. वर्धा शहराला कोणत्याही परिस्थित निधी कमी पडू देणार नाही. शहरात आणखी अश्याच प्रकारे उद्यानाची निर्मिती करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महावीर उद्यानाचा विकास म्हणजे वर्धा नगर परिषदेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गत २५ वर्षांपासून आम्ही याचा पाठपुरावा करीत होतो. आज या उद्यानाचा नवीन चेहरा वर्धा शहरातील नागरिकांना अर्पण करण्यात येत आहे, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. जनहित मंचाने महावीर उद्यानाच्या विकासासाठी भरपूर परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनी जनहित मंचाचे आभार व्यक्त केले. महावीर उद्यानाचाच विकास करुन ते वर्धा नगरीला अर्पण करणे हे आमचे ध्येय होते. ते आज या ठिकाणी आम्ही साध्य केले आहे. असाच विकास शहरातील अनेक उद्यानाचा करायचा आहे. तेही आम्ही करणार असल्याचे यावेळी न. प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर यांनी सांगितले. न.प.अंतर्गत हरित वर्धा साकारण्यासाठी नगर परिषदेने टाकलेलं हे एक पाऊल आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे यांनीही मार्गदर्शन केले. श्यााम टिबडा आणि अतुल टिबडा यांच्या परिश्रमातून साकरलेल्या या उद्यानात अ‍ॅम्युजमेंट पार्क, फूड झोन, फन झोन, विशाल इंद्रधनुषीय पाण्याचा कारंजा, मुलांसाठी फ्री प्ले-झोन, पिण्याचे थंड पाणी, शौचालय इत्यादी सोयी सुविधा आहेत. त्याच बरोबर बुल राईड, भूत बंगला, ७ डी अ‍ॅडव्हेंचर राईड, जम्पर, एटीव्ही बाईक राईड, मिनी बोटिंग, सेगवे राईड, मिनी फेरीस व्हील, गेम झोन या आणि इतर अनेक मजेदार व करमणूक प्रदान व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उत्तम हापसे यांनी केले तर आभार लिखिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा शहरातील महावीर उद्यानाचा चेहरामोहरा बदलल्याने वर्धेतील निसर्ग प्रेमींची एका परिपूर्ण उद्यानाची प्रतीक्षा थांबली आहे.(शहर प्रतिनिधी)