पाच महिने लोटूनही सूचना नाही : वर्धेत ७५ हजार लाभार्थी गौरव देशमुख वर्धापाच महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजना जाहीर केली. या अंतर्गत नोंदणी करूनही अद्याप जिल्ह्यातील हजारो दारिद्र्य रेषेखालील महिलांना गॅसची जोडणी मिळाली नाही. केंद्र शासनाकडून या योजनेचा प्रचार जोरात केला जात आहे; पण लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसते.जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील ९१ हजार ८ कुटूंब आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे तीन लाख कुटुंबांपैकी ७५ हजार कुटुंबांना गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. ‘गिव्ह ईट अप’ योजनेंतर्गत नाकारण्यात येणार असलेल्या गॅस सिलिंडरच्या अनुदानातून ही योजना राबविली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात सुमारे ८ हजार ५३ ग्राहकांनी या योजनेंतर्गत सिलिंडरची सबसीडी नाकारली आहे. असे असताना जिल्ह्यात या योजनेचा कुठलाही लाभ सहभागी नागरिकांना मिळालेला नाही. या योजनेच्या लाभाकरिता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षाच
By admin | Updated: August 26, 2016 02:01 IST