शेतकऱ्यांची होते पायपीट : खासगी व्यापाऱ्यांकडून अत्यल्प भावात लूटकारंजा (घा.) : प्रत्येक तालुकास्थळी १५ नोव्हेंबरपासून शासनामार्फत कापूस खरेदी केली जाईल, असे शासनाने घोषित केले होते; पण अद्यापही कारंजा तालुक्यात कापसाची शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने खासगी व्यापाऱ्यांमार्फत अत्यल्प भावात विकत घेऊन कापूस उत्पादकांची लूट सुरू आहे. कारंजा तालुक्यात १२ हजार हेक्टर जमिनीमध्ये यावर्षी कापसाचा पेरा झाला. हेक्टरी १० क्विंटलचे सरासरी उत्पादन पकडले तरी एक लाख २० हजार क्विंटल कापूस उत्पादित होणार अशी अपेक्षा आहे. शासनाने फेडरेशन किंवा अल्प शासकीय यंत्रणेमार्फत १ नोव्हेंबर पासून कापूस खरेदी सुरू करावी, असे अपेक्षित असताना १५ नोव्हेंबर पासून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकरी वर्गाला पैशाची गरज ही असतेच. नेमकी हीच संधी साधत खासगी व्यापाऱ्यांनी अत्यल्प भावात कापसाची खासगी खेडा खरेदी सुरू करून कापसाला ३ ते साडेतील हजार इतका कमी भाव खरेदी सुरू केली. पैशाची नितांत गरज असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. कारंजा हे तालुक्याचे ठिकाण असूनही येथे शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. कारंजाच्या कापूस उत्पादकांना ७० किलोमीटर लांब अंतरावरील तळेगावला कापूस विक्रीसाठी न्यावा लागतो आहे. त्यासाठी भाड्याचे जादा पैसे मोजावे लागतात. एका दिवसाचे श्रमही वाया जातात. आणि एवढा आटापिटा करून हमीभाव मिळतो तो एका क्विंटलला ४ हजार १०० रूपये. एक क्विंटल कापूस पिकवायला शेतकऱ्याला पाच हजार रुपयआंच्या आसपास खर्च येतो. त्यामुळे खरोखरच हे शासन शेतकरी हिताचे निर्णय घेते का असा प्रश्न निर्माण होत आहेकारंजाला चार ते पाच एकर जागा, असलेला, शिवप्रक्रिया सहकारी संस्थेचा मोठा परिसर आहे. १४ रेचे आहेत. मागील वर्षी हा परिसर खासगी व्यापाऱ्याला कापूस खरेदी साठी भाड्याने दिला होता. यावर्षी सुद्धा अशाच प्रकार शिव सहकारी संस्थेचा परिसर भाड्याने देवून येथे कापसाची शासकीय खासगी खरेदी करता आली असती पण तसे न केल्यामुळे कारंजातील कापूस उत्पादकांना आपला कापूस, तळेगावला न्यावा लागत आहे. त्यामुळे ताबडतोब शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
कापूस उत्पादकांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा
By admin | Updated: November 19, 2015 02:49 IST