शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांना प्रचारासाठी पाच दिवसांची प्रतीक्षा

By admin | Updated: February 3, 2017 01:56 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या

पक्षीय उमेदवारांचा प्रचार सुरू : ७ फेब्रुवारीला होणार अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटपरूपेश खैरी   वर्धाजिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडला. त्यांची प्रचार कार्यालयेही गजबजू लागली आहेत. तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत करणेही सुरू झाले आहे. मात्र अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांना प्रचाराकरिता आणखी पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिन्ह वाटप ७ फेब्रुवारीला होणार आहे. चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत अपक्षांना प्रचार करणे शक्य होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाली त्या काळापासूनच इच्छुकांनी आपण गट किंवा गणाच्या मैदानात उतरणार असल्याचे बिगुल फुंकले होते. त्यांच्याकडून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरिता दावेदारी सिद्ध केली होती. अशांनी उमेदवारी आपलीच म्हणून नामांकनाच्या पूर्वीच प्रचार सुरू केला होता. परिसरात गावसभा घेणे सुरू केले होते. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी त्या भागात उघडलेले प्रचार कार्यालय आता नियमित केले.ज्यांना उमेदवारी नाकारली अशातील काहींनी पक्षनिष्ठा धाब्यावर बसवून दुसऱ्या पक्षात जात उमेदवारी मिळवून आपला प्रचार कायम ठेवला. तर काहींनी बंडखोरी करीत अपक्ष दावेदारी दाखल केली. त्यांनी पक्षाच्या नावावर गावात गाठीभेटी घेतल्या असताना अचानक अपक्ष दावेदारी दाखल केली, ती कशामुळे याचा खुलासा करण्याकरिता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण ९९६ जणांनी नामांकन दाखल केले. यात जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता तब्बल ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले. यात अपक्षांचा भरणाही अधिक आहे. एक वर्धा तालुक्यात नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता तब्बल ६० अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेकरिता २५ तर पंचायत समितीकरिता ३५ जणांचा समावेश आहे. यातील काहींची उमेदवारी पक्षाने नाकारलेल्या तिकिटामुळे झालेल्या नाराजीतून तर काहींची केवळ हौशेपाटी असल्याचे दिसून आले आहे. रिंगणात असलेल्या अपक्षांपैकी किती जण कायम राहतात हे नामांकन अर्ज परत घेण्याच्या दिवशीच कळणार आहे. चिन्ह वाटपानंतर अपक्ष उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ आठ दिवस मिळणार आहेत. या आठ दिवसात चिन्ह परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या तुलनेत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यांचा छापिल जाहीरनामा तयार झाला असून तो मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता यंत्रणा तयार झाली आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी वॉर्ड सभा घेण्याचे नियोजन तयार केले आहे. या उलट अपक्ष उमेदवारांची प्रचाराकरिता गोची होत असल्याचे पाहायला मिळते.