शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदी पात्राला स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 20, 2015 00:11 IST

महात्मा गांधी स्वच्छता मिशन अंतर्गत गंगा, यमुना आदी मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे; पण शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी कित्येक वर्षांपासून काठावर वाढलेली बेशरम,

बेशरम, निर्माल्यामुळे नदीला प्रदूषणाचा विळखाप्रभाकर शहाकार - पुलगावमहात्मा गांधी स्वच्छता मिशन अंतर्गत गंगा, यमुना आदी मोठ्या नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे; पण शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी कित्येक वर्षांपासून काठावर वाढलेली बेशरम, घाटावर साचणारी घाण, केरकचरा, निर्माल्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे़ वर्धा नदी पात्राला अद्यापही स्वच्छता मोहिमेची प्रतीक्षाच करावी लागत आहे़नदीच्या पंचधारा घाटावर पौराणिक इतिहासाची साक्ष देणारे ४०० वर्षांपूर्वीचे भोसलेकालीन शिव मंदिर आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीवर हरितालिका, नारळी पौर्णिमा या सणांना महिलांची गर्दी होते़ नदीचे धार्मिक व पौराणिक महत्त्व लक्षात घेता सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरत होती़ अधिक मासात भाविक दररोज पहाटे गंगास्रानाचा आनंद लुटत होते़ शहर, केंद्रीय दारूगोळा भांडार व अनेक गावांना याच नदीतून पाणी पुरवठा होत होता़ पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी वर्धा जेव्हा कोपायची, तेव्हा शहरवासी तिचा राग शांत व्हावा म्हणून पूजाअर्चा, आरती करून श्रीफळ अर्पण करीत होते़ लाखो लोकांची शेती फुलविणारी, कित्येक गावांना पाणी पुरवठा करणारी नदी शांतपणे प्रवाहित असायची; पण गत तीन दशकांत नदीवर धरण बांधण्यात आले व नदीचा प्रवाह खंडित झाला. प्रवाहित नदी पात्रात पूर्वी घाण नव्हती; पण प्रवाह खंडित झाल्याने खडक उघडे पडले़ तीनही घाटांच्या पूढे बेशरम वाढली़ खंडित जलप्रवाहाने विसर्जित देवी-देवतांच्या मूर्ती घाण पाण्यात तशाच पडून दिसतात. नदीच्या पात्रात साचलेले डबके, उगवलेली वनस्पती, तरंगणारे निर्माल्य यामुळे नदी प्रदूषित झाली़ पंचधारा स्मशान घाटावर शवयात्रेत येणाऱ्यांना स्नानासाठी तर दूर पिण्यासाठीही पाणी राहत नाही. धरणातून पाणी सोडलेच तर चार-सहा दिवस प्रवाह सुरू असतो़ नंतर नदीचा खडकाळ अंतरंग दृष्टीस पडतो़ गुंजखेडा घाटावर एमईएस, पुलगाव, गुंजखेडा व नाचणगाव पाणी पुरवठा योजना असल्याने तेथे काही प्रमाणात पाणी अडविले; पण नदीच्या पात्रात अन्य ठिकाणी थोडे फार प्रदुषणयुक्त पाणी असते़ तत्कालीन पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळ यांनी संघटनांच्या साह्याने स्वच्छता अभियान राबवून नदीचा घाट व परिसर स्वच्छ केला होता; पण सध्या स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा आहे़ शासन, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़पौराणिक इतिहासाची साक्ष; तीन घाटांची निर्मितीउत्तर-दक्षिण वाहणारी वर्धा नदी शेकडो वर्षांपासून पौराणिक इतिहासाची साक्ष देत आहे़ दक्षिणेकडे वाहत जाऊन पूढे कोटेश्वर या तीर्थक्षेत्री ती उत्तर वाहिनी होते. या नदीला ऋषिमुनीचे सान्निध्यच नव्हे तर मोठमोठे यज्ञ, पाहुण्यांचे भाग्यही लाभले आहे. नागरिक नदीच्या पवित्र प्रवाहात स्रान करायचे. ही गरज लक्षात घेत नदीवर १९२८ मध्ये (विक्रम संवत १९८४ ज्येष्ठ शुक्ल १५) स्व. जोहारमल सोमाणी रा़ बिकानेर यांची पत्नी व सेठ शिवाजी मुंधडा यांची कन्या सीताबाई यांनी घाट बांधला़ त्यास सीता घाट संबोधले जाते़ १९३४ मध्ये (विक्रम संवत १९९१ वैशाख शुक्ल १०) स्व. गंगादिन केसरवाणी जन्म बदलपूर प्रयागराज यांनी दुसरा घाट बांधला तर जमीनदास मदनमोहन केला रा़ जैसलमेर राजस्थान यांनी ९ मे १९३५ (विक्रम संवत १९९२ वैशाख शुक्ल ३) मदनमोहन घाटाचे बांधकाम करून स्नानाची सोय केली़