शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद स्मृतिस्तंभाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 19, 2017 02:19 IST

सन १९४२ मधील सातंत्र्यलढ्यात सहा शूर शहीद झाले होते. त्यांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला होता.

शहिदांना दिला होता भडाग्नी : २५ लाखांचा निधी खितपत लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सन १९४२ मधील सातंत्र्यलढ्यात सहा शूर शहीद झाले होते. त्यांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला होता. या बलीदानाचे सदैव स्मरण राहावे म्हणून बाकळी नदीच्या काठावर स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्याच्या विस्तार व सौंदर्यीकरणाचे काम मंजूर झाले; पण अनेक अडथळे येत आहेत. मागील वर्षी २५ लाख रुपयांची निविदा झाली; पण अद्याप बांधकामाचा पत्ता नाही. यामुळे शहिदांच्या स्मृतिस्तंभाला सौंदर्यीकरणाची किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आष्टी शहरात दाखल होताना सुरूवातीलाच बाकळी नदीच्या काठावर शहीद स्मृतिस्तंभ आहे. त्याच्या सभोवताल काही वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. या ठिकाणी दरवर्षी नागपंचमी (शहीद स्मृती दिन सोहळा), गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाते. या स्थळाची महती लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहीदभूमी विकासाकरिता दिलेल्या ५ कोटींतून २५ लाख बांधकाम तथा सौंदर्यीकरणावर खर्च करण्याचे ठरले होते. त्याचे नियोजन करून सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्टेंबर २०१६ मध्ये ई -निविदा काढली. सदर काम आर्वी येथील एका एजन्सीला मिळाले; पण कामाचा कार्यारंभ आदेश मिळताच यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी लागूनच बंधारा बांधकाम व नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे काम सुरू आहे. खोलीकरणाचा गाळ अगदी स्मृतिस्तंभाला लागून टाकल्याने सौंदर्यीकरणाचे काम अडकले आहे. शिवाय बांधकामाची जागा भूमिअभिलेखाच्या नकाशात दिसत नसल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाला शहिदांच्या विकासासाठी जागेची ‘अ‍ॅलर्जी’ होणे यावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सदर काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. सदर काम पूर्ण झाल्यावर स्मृतिस्तंभाचा कायापालट होणार आहे. सोबतच प्रवेशद्वारही होणार असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसराचे सौंदर्य खुलणार आहे. यामुळे शहीद स्मृतिस्तंभाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जागेच्या वादामुळे काम प्रलंबित शहिदांना ज्या ठिकाणी भडाग्नी दिला होता, तेथे शहीद स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्यांचे सौंदर्यीकरण मंजूर असताना जागेचा वाद समोर आला आहे. प्रस्ताव सादर करूनही अद्याप मोजमाप प्रक्रिया न झाल्याने स्मृतिस्तंभ विकास, सौंदर्यीकरणाचे काम प्रलंबित आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहीद स्मृतिस्तंभाची निविदा झालेली आहे. जागेच्या मोजमापाकरिता प्रकरण सादर करण्यात आले होते; पण ते काम अद्याप झाले नाही. जागेच्या मोजमापानंतरच बांधकामाचा तिढा सुटणार आहे. यामुळे बांधकामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. - अनंत भाष्करवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्वी.