शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

२१,५८२ शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:36 IST

गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकºयांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देअहवाल कधीचाच सादर : शासनाकडून निकष जाहीर; पण अनुदान नसल्याने मदत नाही

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले होते. यामुळे सर्वच स्तरावर मदत देण्याची ओरड झाली होती. परिणामी, शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली. यात सर्वच शेतकऱ्यांना मदत देण्याचे निकष ठेवण्यात आले होते; पण नवा खरीप तोंडावर आला असताना एकाही शेतकऱ्याला जुन्या हंगामातील नुकसानीची मदत मिळाली नाही.शेतकऱ्यांचे मुख्य पीक असणाऱ्या कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. यात ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्या कपाशी पिकांना मदत देण्याचे शासनाने जाहीर केले. या निकषात तालुक्यातील २१ हजार ५८२ शेतकरी येत असून त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. या निकषाचा सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा लाभ व्हावा यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्यात आला. यात शासनाने २३ फेब्रुवारी व त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या अध्यादेशात नव्याने पैसेवारीची अट रद्द केली. यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.नव्या अध्यादेशात शासनाने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यात आता कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर ६ हजार ८०० रुपये तर ओलीतासाठी १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली; पण या मदतीची अंमलबजावणी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना मदतीची घोषणा ही शासनस्तरावरील आहे. याबाबत नव्याने अध्यादेश काढून सर्वच शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदतीबाबतची सूचना व निर्णय प्राप्त झाला नाही.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :cottonकापूस