शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवजीवनच्या थांब्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:21 IST

एकेकाळी पुलगाव ही कॉटन मील व कापसाची बाजार पेठ होती. पुलगाव-आर्वी ही शकुंतला रेल्वे गाडी, गणेशोत्सव यामुळे पुलगाव शहराला वैभवशाली परंपरा लाभलेली होती.

ठळक मुद्देरामदास तडस : विरोध झाला तरी पुलगावचे गेलेले वैभव परत मिळवून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : एकेकाळी पुलगाव ही कॉटन मील व कापसाची बाजार पेठ होती. पुलगाव-आर्वी ही शकुंतला रेल्वे गाडी, गणेशोत्सव यामुळे पुलगाव शहराला वैभवशाली परंपरा लाभलेली होती. काँग्रेस शासनाच्या काळात भरभराटीस आलेला एक मोठा वस्त्रोद्योग बंद झाला. केंद्र व राज्यात सध्या भाजपाचे सरकार असून कितीही विरोधी झाला तरी आपण या शहराचे गेलेले वैभव परत मिळवून देऊ, अशी ग्वाही खासदार रामदास तडस यांनी पुलगाव रेल्वे स्थानकावर अमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्स्प्रेसचे स्वागत करताना दिली.स्थानिक रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ वर भाजपा शहर तर्फे नवजीवन एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष शितल गाते, वर्धा न.प.चे माजी नगरसेवक कमल कुलधरीया, स्टेशन अधीक्षक सवाई, भाजपा जिल्हा प्रवक्ता राहुल चोपडा, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, पे्रमप्रकाश पाटणी, रमेश तिवारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. खा. तडस पुढे म्हणाले, शासनाची मंजूरी नसल्यामुळे थांबलेले रेल्वे उड्डानपुलाचे काम, केंद्रीय दारूगोळा भांडारामुळे अडलेले स्मशानभूमीचे सौदर्यीकरण, पुलगाव- आर्वी-वरूड-आमला या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर, नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गाचे चौपदरीकरण आदी प्रश्न लवकर मार्गी लागावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यापैकी अनेक कामासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. पुलगावकरांची १३ वर्षांपासून असलेली नवजीवन एक्सप्रेसच्या थांब्याची मागणी आज पूर्ण झाली आहे. नागपूर-पुणे गरीब रथ, बिलासपूर-पुणे एक्सप्रेस, आजाद हिंदू एक्स्प्रेस या जलद रेल्वे गाड्यांचा पुलगाव स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून भाजपा कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार यांच्या सहकार्याशी शिवाय कुठलेही काम शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवजीवन एक्सप्रेस येण्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात शहरातील नगर परिषद, भाजपा व्यापारी, संघटना, जैन युवा मंच, बाबा बर्फानी ग्रुप, वाल्मीकी समाज, बेलदार समाज, मुस्लीम समाज, यांचेसह शहरातील विविध सामाजिक संघटनाद्वारे खा. तडस यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजेश बकाने, सुरेश वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. नवजीवन एक्सप्रेसचे चालक एम. कुस्ती व गार्ड राठोड व प्रथम प्रवाशी डॉ. एम. मोहनराव यांचा सपत्नीक खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नितीन बडगे यांनी केले. संचालन आकाश दुबे यांनी केले.