शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाघोली रेतीघाटावरून पोकलँडसह ट्रॅक्टर जप्त

By admin | Updated: April 18, 2016 04:24 IST

जिल्ह्यात रेती माफियांची शिरजोरी सुरूच असल्याचे वाघोली रेतीघाटावर दिसत आहे. येथे पोलिसांनी कारवाई करीत रेतीचा

वर्धा : जिल्ह्यात रेती माफियांची शिरजोरी सुरूच असल्याचे वाघोली रेतीघाटावर दिसत आहे. येथे पोलिसांनी कारवाई करीत रेतीचा उपसा करण्याकरिता लावण्यात आलेला पोकलँड व एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यात एकूण २५ लाख ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईत घाटावर कार्यरत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. मुन्ना सुखराम यादव (२०) रा. देरवा, व निवृत्ती चंद्रशेखर मोकदम (२४) रा. फत्तेपुर अशी त्यांची नावे आहेत. तर या प्रकरणात रेती घाट मालक प्रणव गौरखेडे रा. तिवसा व हुकूम जागे या दोघांविरूद्ध तळेगाव (श्यामजीपंत) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. जिल्ह्यात रेती माफियांकडून नियमांना तिलांजली देत रेतीचा उपसा सुरू आहे. राज्यात छापील रॉयल्टी बंद असताना येथे त्याच रॉयल्टीवर रेतीची उचल होत असल्याचे अनेक वेळा समोर आले. या रेती माफीयांवर अंकुश लावण्याकरिता पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र त्यांना अंकुश लावण्यात अपयश आल्याचेच दिसून येत आहे. पोलिसांच्यावतीने होत असलेल्या कारवाई दरम्यान तळेगाव हद्दीतील वाघोली रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी वाघोली घाट सर्व्हे क्रमांक ५ ची पाहणी केली असता नदी पात्रात क्रमांक नसलेला एक पोकलँड व बाजूला ट्रॅक्टरच्या ट्रॉवर जाळी लावून रेतीचा उपसा होत असल्याचे दिसून आले. यावेळी पोकलँड चालक मुन्ना सुखनारायण यादव व रेती घाटावर हजर असलेला निवृत्ती चंद्रशेखर मोकदम (२४) याला पोलिसांनी विचारपूरस केली असता त्याने रेतीघाट मालक प्रणव गौरखेडे याच्या सांगण्यावरून हुकूम जागेच्या आदेशाने पोकलँडने रेतीचा उपसा करून ढिगारे लावण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून मुन्ना यादव व निवृत्ती मोकदम रा. फत्तेपुर या दोघांना अटक करण्यात आली. तर रेतीघाट मालक प्रणव गौरखेडे रा. तिवसा व हुकूम जागे याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एकूण ६० ब्रास रेती व साहित्य असा एकूण २५ लाख ७४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा नोंद करून प्रकरण तळेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.सदर कारवाई जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या राबविली.(प्रतिनिधी)कारवाईनंतरही रेतीचा उपसा ४वाघोली येथील रेतीघाट तिवसा येथील प्रणव गौरखेडे याने घेतला आहे; मात्र त्याच्याकडून येथून मोठ्या प्रमाणात नियमांना तिलांजली देत रेतीचा उपसा होत असल्याचे समोर आले. यावरून बुधवारी आष्टी (शहीद) येथील तहसीलदार सीमा गजभिये यांनी या घाटावर कारवाई केली. त्यांनी घाटावरील पोकलँड जप्त करण्याची कागदी कारवाई करीत तो नेण्याकरिता साहित्य नसल्याचे कारण काढत तिथेच ठेवला. पोकलँड घाटावरच असल्याने घाट मालकाने जप्त पोकलँडच्या सहायाने रेतीचा उपसा केल्याचे या कारवाईत समोर आले. असे असले तरी यात महसूल विभागाकडून अनागोंदी झाल्याची चर्चा पोलीस विभागात जोरात आहे.