येथील श्री राम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी ‘पाडवा पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. सोशालिस्ट चौक येथे पहाटे ५ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या कार्यक्रमाला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गायिका सावनी रवींद्र व गायक तथा संगीतकार अजित परब यांच्या चमूचा कार्यक्रम झाला. पहाटे ५ वाजताचा कार्यक्रम असतानाही कार्यक्रमापूर्वीच सोशालिस्ट चौक ते इंगोले चौकापर्यंत रस्ता नागरिकांच्या गर्दीने खच्च भरला होता. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, शालिनी मेघे, आ. पंकज भोयर , नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, उपाध्यक्ष कमल कुलधरीया, माजी आमदार सरोज काशीकर, रवी शेंडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अतिथींचे नारळ व भेटवस्तू देत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला. वाहतुकीची कोेंडी होणार नाही या दृष्टीने रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळती करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
सुमधूर गाण्याने वर्धेकरांची पाडवा पहाट :
By admin | Updated: March 22, 2015 01:49 IST