शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मतदान आटोपले, आज लागणार निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:06 IST

मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले असून, ७८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले असून, सोमवारी मत मोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.वर्धा तालुक्यातील सालोड (हिरपूर), बोरगाव (ना.), आर्वी तालुक्यातील मांडला, जाम, सर्कसपूर, अहिरवाडा, हैबतपूर (पु.), मिर्झापूर (नेरी) व पिपरी भुतडा पुनर्वसन या ९ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाकरिता २७ उमेदवार रिंगणात आहे. सालोड येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदांकरिता ५०, नांदोरा येथे सरपंच पदाकरिता २, तर सदस्य पदांकरिता १४,  सर्कसपूर येथे सरपंच पदाकरिता ३, तर सदस्य पदांकरिता १४, मांडला येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदाकरिता १७, अहिरवाडा येथे सरपंच पदाकरिता २, हैबतपूर (पु.) येथे सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, जाम (पु.) सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, पिपरी (पु.) सरपंच पदाकरिता २, तर १३ सदस्य पदांकरिता, मिर्झापूर (ने.) येथे सरपंच पदाकरिता २ उमदेवार, तर सदस्यांकरिता १४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.मतदान केद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त- ३३ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये १० हजार ८१९ मतदार संख्या होती. त्यातील ८ हजार ४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.  याकरिता अधिकाऱ्यांचेही भरारी पथक तयार करण्यात आले होते. या पथकानेही सतत मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला. त्यामुळे ३३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.

तहसील कार्यालयात होणार आज मतमोजनी- जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीकरिता रविवारी मतमोजणी आटोपली असून आता सोमवारी सकाळी दोन्ही तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोमवारी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळणार आहे.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक