शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:00 IST

सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुका तोंडावर येताच अनेक नेते पक्ष बदलवितात. इतकेच नव्हे, तर ते सत्ता भोगण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. हे लोक संधिसाधू असून त्यांना मतदारांनीच धडा शिकवायला हवा. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. वर्ध्यात आंदोलनाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर ही बोचरी टीका केली.प्रहार मागील १५ वर्षांपासून विविध प्रश्न घेऊन संघर्ष करीत आहे. आम्ही ज्या उद्देशासाठी एकत्रित आलो, त्या उद्देशाला कधीही विकेंद्रित होऊ दिले नाही. सत्तेच्या हव्यासापोटी ज्या कुठल्या पक्षाचे राजकीय पुढारी पक्ष बदलवितात, अशा दलबदलूंना निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांनी लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे पाच वर्षे विरोधी पक्ष नेते राहिले; पण काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच भाजपात जात आहे. त्यामुळे काँग्रेस मोडून टाकायला हवी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपात सामावून घ्यायला पाहिजे, म्हणजे दुसरा राजकीय पक्षच शिल्लक राहणार नाही. आता आम्ही ठरवतोय की पक्षाचे झेंडेच शेतात पेरावे लागेल. कारण शेतात पीक पिकविल्याने शेतकऱ्यांना काही मिळत नाही. एकूणच शेतात पक्षाचे झेंडे पेरून त्यातच समाधानी राहावे लागेल, अशी आजची अवस्था असल्याचेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

जनादेश यात्रेमुळे पैशाची उधळवपट्टी होईलजनादेश आहे की ईव्हीएम, हे पहिले तपासले पाहिजे. यात्रेपेक्षा लोकांचे शेतकऱ्यांचे काही समाधान होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टीच होणार आहे. आचार संहितेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या आताच पूर्ण केल्या जाऊन नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम या निमित्ताने केले जाणार आहे. सध्या शेतकरी आत्महत्या करीत आहे. इकडे आमदारांची मेगा भरती सुरू आहे. परंतु, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर तलवार चालविली जात आहे, असल्याचे यावेळी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू