शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:21 IST

आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देराजू तिमांडे। आर.एस.आर. मोहता मिल प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली.आर. एस. आर मोहता मिल हिंगणघाटला १२० वर्षे पूर्ण होत आहेत. या मिलमध्ये विव्हिंग अ‍ॅण्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू आहे. मिलमध्ये ३ शिफ्टमध्ये कामगार काम करतात. या मिलमध्ये २०१५ पर्यंत १२०० ते १३०० कामगार काम करीत होते. तसेच ठेकेदारीमध्ये जवळपास २०० कामगार काम करतात.१ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाते बंद केले. २०११ पासून व्यवस्थापनाने कपडा खाते बंद करण्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. ३० डिसेंबर २०१६ ला औद्योगिक न्यायालयाने आदेश देऊन कपडा खाते बंद करण्यासंबंधी कामगार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले. मुंबई कामगार आयुक्तांनी कामगार आयुक्त, नागपूर यांना कपडा खाते बंद करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मोहता मिल व्यवस्थापनाने कपडा खाते बंद केले.सद्यस्थितीत मिलचे सर्व युनिट सुरू असून फायद्यात आहे. कंपनीतून कापड व सूत निर्यात केले जात आहे. असे असताना कामगार आयुक्त, मुंबई यांनी कपडा खाता बंद करण्याचे आदेश देताना कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचे टाळले आहे. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान झाले एवढेच नव्हे, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कपडा खाता बंद करताना ४५० कामगारांना व्हीआरएस मंजूर करून द्यायला पाहिजे होता. त्याआधी व्यवस्थापनाने कपडा खात्यातील ६८ कामगारांना व्हीआरएस दिला होता.कामगारांचे हित लक्षात घेत मोहता मिलच्या कामगारांना सरकारने व्ही.आर.एस देण्यासंबंधीचे आदेश देऊन कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Raju Timandeराजू तिमांडे