शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महाअवयवदान अभियानात स्वेच्छा सहभाग घ्यावा

By admin | Updated: September 1, 2016 02:11 IST

अवयवाचा प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवसंजिवनी देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहे. नागरिकांनी अभियानात

शैलेश नवाल : जनजागृती रॅलीने प्रारंभ, विद्यार्थ्यांचा सहभागवर्धा : अवयवाचा प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवसंजिवनी देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहे. नागरिकांनी अभियानात स्वेच्छा सहभाग घेत अवयवदान करीत गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय प्रत्यारोपणन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्यभर महा अवयवदान अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा शुभारंभ बुधवारी जनजागृती रॅलीने करण्यात आला. बुधवारी सकाळी ७.३० वाजता सामान्य रुग्णालयात खा. रामदास तडस यांनी अवयवदान नोंदणी व जनसंपर्क कक्षाचे उद्घाटन केले. रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. रॅलीच्या समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड, डॉ. अनुपम हिवलेकर, हिवताप अधिकारी धाकटे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, रोटरी क्लबच्या अध्यक्ष सुनीता इथापे, महाअवयवदान समन्वयक पी. एस. काकडे उपस्थित होते. रॅली सामान्य रुग्णालय, बजाज चौक, बढे चौक, मार्केट लाईन, महादेवपूरा ते पुन्हा रुग्णालयात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत ११ महा.तील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जनजागृती केली.पोलीस अधीक्षक गोयल यांनी तरुणांनी अवयवदानाची नोंदणी करावी. याबाबत सामान्यांत नागरिकांत जनजागृती करावी, असे आवाहन केले. डॉ. जुनेद शेख यांनी कोणते अवयव दान करता येतात व कायद्यानुसार वैधतेची माहिती दिली. डॉ. मडावी यांनी प्रास्ताविकात अवयवदानाची संकल्पना देशात राबविली जात असून तीन दिवस महाविद्यालयांत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले. अवयव दानांतर्गत हृदय, मुत्रपिंड, किडणी, यकृत, फुफ्फुस, डोळे, त्वचा, प्लीहा यासारख्या अवयवाचे दान करता येते, अस सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)