शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीजेएमच्या मावळ्यांनी सर केली दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:06 IST

स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जागृतीसाठी वैद्यकीय जनजागृती मंचच्या दोन सदस्यांनी सेवाग्राम ते राजघाट दिल्ली असा दुचाकी प्रवास केला.

ठळक मुद्देसेवाग्राम ते राजघाट दुचाकी प्रवास : स्वच्छता, वृक्षारोपण व आजारांबाबत केली जागृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जागृतीसाठी वैद्यकीय जनजागृती मंचच्या दोन सदस्यांनी सेवाग्राम ते राजघाट दिल्ली असा दुचाकी प्रवास केला. व्हीजेएमच्या या मावळ्यांनी गांधी जयंतीदिनी दिल्ली सर करीत स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांचा बुधवारी व्हीजेएम धाम हनुमान टेकडी येथे सकाळी ७.३० वाजता शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.१५ सप्टेंबर रोजी अरविंद लोहे व संजय लबडे यांनी व्हीजेएम धाम व सेवाग्राम आश्रमात महात्म्याला नमन करून यात्रेस प्रारंभ केला होता. स्वच्छता व वृक्षारोपण हा संदेश घेऊन त्यांनी १४२० किमी प्रवास केला. वाटेत पोलीस ठाणे, मुख्य चौक, शाळेत, ग्रामपंचायत आदी ठिकाणी स्वच्छता केली. डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजार कशाने होते, त्यावर उपाययोजना काय याबाबत पत्रके वाटली. प्रत्येक विश्रामाच्या ठिकाणी एक झाड लावून संगोपनाची जबाबदारी स्थानिकांना दिली. कुठे उत्साहात स्वागत, कुठे सकारात्मक प्रतिसाद तर काही ठिकाणी अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करायला व्यासपीठ मिळाले.प्रवासात बरेच बरेवाईट अनुभव घेत या मावळ्यांनी २ आॅक्टोबर रोजी दिल्ली सर केली. राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहून प्रवासाचा शेवट केला. त्यांच्या संकल्पपूर्तीचा अनुभव अभिमानस्पद असून हनुमान टेकडी येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्य तथा मान्यवरांनी दोन्ही मावळ्यांचे कौतुक केले.