शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वाहितपूर शाळेला लोकसहभागांतर्गत शेळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:46 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाहितपूर येथे लोकसहभागाून वर्गखोली बांधकाम आणि इतर शालेय भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी कार्य सुरू आहे.

ठळक मुद्देमाजी विद्यार्थ्याची अफलातून संकल्पना : कल्याणी ठरणार वाहितपूर शाळेचे एटीएम

प्रफूल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाहितपूर येथे लोकसहभागाून वर्गखोली बांधकाम आणि इतर शालेय भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी कार्य सुरू आहे. या कार्यात शाळेचा माजी विद्यार्थी रोशन क्षीरसागर यानेही खारीचा वाटा उचलला आहे. त्याने एक शेळीच शाळेला भेट दिली आहे. त्या शेळीचे नाव मुलांनी ‘कल्याणी’ ठेवले असून ही कल्याण या शाळेकरिता एटीएम ठरणार असल्याची गावात चर्चा आहे.क्षीरसागर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शाळेला भेट म्हणून दिलेल्या शेळीचे पालनपोषण हा माजी विद्यार्थी स्वत:च्या घरी करीत आहे. या शेळीला वर्षातून दोन वेळा पिल्लांच्या माध्यमातून उत्पादन होणार आहे. ही पिल्लं मोठी झाल्यानंतर त्यांना विकून येणारे पैसे शाळेला देणार आहे. यातून शालेय सुविधा उपलब्ध करून घेणार असल्याचे मुख्याध्यापक देवेंद्र गाठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे ही कल्याणी नेहमीकरिता शाळेचे एटीएम म्हणून राहणार आहे.शाळेला शेळी भेट देण्याच्या या अफलातून संकल्पनेबाबत खा. रामदास तडस व आ.डॉ. पंकज भोयर यांना माहिती दिली असता त्यांच्या हस्ते वर्गखोली लोकार्पण सोहळ्यात रोशनचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्राणीमात्रांवर पे्रम करावे, त्यांच्याप्रती जिव्हाळा, आपूलही, दया, माया ठेवावी या बाबी शिकविता येणार आहे. शिवाय शेळीपालनातून उत्पादन, उद्योग व आर्थिक फायदा या बाबीही नकळत विद्यार्थी शिकत आहेत.

वर्षाकाठी शाळेला मिळणार १० हजार रुपयांचे उत्पन्नया उपक्रमातून दरवर्षी १० हजार रुपये शाळेला मिळणार आहेत. एवढा लोकसहभाग नगदी स्वरुपात मिळत राहणार असल्याने त्याचा लाभ शाळेला होईल. एक गरीब विद्यार्थी मनाने श्रीमंत असल्याने आज आपल्याच गावातील लहान मुलांसाठी हातभार लावत आहे. ही कौतुकाची बाब आहे. लोकसहभागासाठी खुप पैशाची गरज नसते तर मनाचा मोठेपणा आवश्यक असल्याचे रोशन क्षीरसागर या मुलाने सिद्ध केले आहे.