शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सोयाबीन पिकावर व्हायरसचा अ‍ॅटॅक; नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:46 IST

चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची झाडे करपून गेली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत, कृषी विभागाचे दुर्लक्ष

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची झाडे करपून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे. पण मात्र कृषिविभाग उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.देवळी तालुक्यातील जामनी येथील शेतकरी वाल्मिकराव येणकर यांनी केलेल्या शेतातील एक एकर शेतात बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना मकत्यासह २५ हजार रुपये खर्च आला, खत, फवारणी, वेळोवेळी देण्यात आले. तसेच पाण्याचेही व्यवस्थापन योग्य रित्या करण्यात आले. यामुळे सोयाबीन पीक चांगले बहरून आले फुले व शेंगही अधिक प्रमाणात लागल्या होत्या. यामुळे चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा येणकर यांना होती. पण व्हायरसच्या अटॅकमुळे येणकर यांचा चांगल्या उत्पादनाच्या स्वप्नाचा पुरता चुराडा झाला. पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटाच्या कात्रीत सापडला असल्याचे दिसून येते.खरीप हंगामातील सोयाबीनचा दानाही अरजला नाही, करिता बीजोत्पादनासाठी म्हणून एक ऐकर उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली, पण यावर व्हायरस चा प्रादुर्भाव झाल्याने हेही सोयाबीन गेले, आमच्या येथे तलाठी व कृषी सहाययक नेहमीच बदलत राहतात. यामुळे यांचा नंबरही मिळत नाही. यामुळे पिकांची माहिती देण्यास विलंब होतो. परिणामी पीक हातचे जात आहे. झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई देण्यात यावी.वाल्मिक येणकर शेतकरी जामनी

टॅग्स :agricultureशेती