शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

दारूचा गुन्हा रद्द करण्यासाठी विरूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:22 IST

दारू बाळगल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरिता येथील किसना खोडे नामक व्यक्तीने मंगळवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले.

ठळक मुद्देरॉकेलची डबकी घेवून गाठले पाण्याच्या टाकीचे छत

आॅनलाईन लोकमतविजयगोपाल : दारू बाळगल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याकरिता येथील किसना खोडे नामक व्यक्तीने मंगळवारी सकाळी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले. यावेळी त्याने सोबत रॉकेलच्या डबक्या नेल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गुन्हा दाखल नसताना झालेल्या आंदोलन झाल्याने पोलिसही विचारात पडले.येथील किसना खोडे (६५) यांची चार जानेवारीला पिण्यासाठी आणलेली दारू पोलिसांनी पकडली होती. त्यामुळे बोंडे यांना पुलगाव पोलीस ठाण्यात बोलावले होते. यामुळे खोडेला आपल्यावर दारूचा गुन्हा दाखल होईल आणि आपल्याला कारागृहात जावे लागले, असे वाटल्याने त्याने गुन्हा दाखल करण्याकरिता हे आंदोलन केले. खोडे विजयगोपाल येथील पाण्याच्या टाकीवरती दोर व रॉकेल घेऊन चढला. तेथून जोपर्यंत केस खारीज करणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. याकडे दुर्लक्ष केल्यास गळफास घेण्याचा इशारा दिला. याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मुरलीधर बुराडे घटनास्थळी दाखल झाले. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले.खोडे यांनी जोपर्यंत सरपंच निलम संजय बिन्नोड येत नाही व गुन्हा दाखल होणार नाही असे लेखी देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे सांगितले. अखेर सरपंच बिन्नोड यांनी लेखी दिल्यानंतर ते खाली उतरले. वास्तविकतेत खोडे वयोवृद्ध असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल केला नव्हता. ते खाली उतरल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.