शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी ठोकले ग्रा.पं.ला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:49 IST

नजीकच्या भुगाव येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात १५ आॅगस्टची रद्द केलेली आमसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३०० ग्रामस्थही उपस्थित झाले; पण यावेळी कुठलीही पूर्ण सुचना न देता सरपंच व ग्रामसचिवांनी ग्रामसभा तहकुब केली.

ठळक मुद्देभूगाव येथील प्रकार : प्रहारच्या नेतृत्वात ग्रा.पं. प्रशासनाचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या भुगाव येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात १५ आॅगस्टची रद्द केलेली आमसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३०० ग्रामस्थही उपस्थित झाले; पण यावेळी कुठलीही पूर्ण सुचना न देता सरपंच व ग्रामसचिवांनी ग्रामसभा तहकुब केली. परिणामी संतप्त ग्रामस्थांनी प्रहारच्या नेतृत्त्वात थेट ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप लावून ग्रा.पं. प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.ग्रामसभा असल्याने गावातील सुमारे ३०० नागरिक ग्रा.पं. कार्यालयात नियोजित वेळेत पोहोचले होते. परंतु, सरपंच व ग्रामसचिवांनी कुठलीही पूर्व सूचना न देता सरळ आमसभा तहकुब केली. आजच्या ग्रामसभेत विविध कामाचा हिशेब, १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च केला कुठे, दिव्यांग बांधवांच्या वाट्याचा असलेला २ टक्के निधी, जि.प.ची जीर्ण शाळा इमारत दुरूस्ती करणे आदी विविध मुद्यांवर चर्चा होणे क्रमप्राप्त होते. याच विषयांना अनुसरून सरपंच व ग्रामसचिव तसेच सत्ताधाऱ्यांकडे उत्तरे नसल्याने ही ग्रामसभा तहकुब करण्यात आल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप लावले. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडके यांनी केले. आंदोलनात नंदकिशोर लोखंडे, पंढरी थूल, बापूराव उरकुडे, दमडू उरकुडे, बंडू सावंत, अरविंद मसराम, रुख्मा गौळकार, गजानन मडावी, नरहरी गौळकार, अनिल कडू, वरुण दिवे, रोशन शास्त्रकार, श्रीकांत पाटील चहांदे आदी सहभागी झाले होते.आंदोलनकर्ते पोहोचले मिनीमंत्रालयातसंतप्त ग्रामस्थांनी ग्रा. पं. कार्यालयाला कुलूप लावल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन घेवून ते जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जि.प. कार्यालयात पोहोले. याप्रसंगी जि. प. प्रशासनाला सदर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामसचिवांचे वाहन कोंडलेशुक्रवारी ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी भुगाव येथील महिला सरपंचाला चांगलेच धारेवर घेतले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ग्रामसचिवांचे वाहन ग्रा.पं. कार्यालयात टाकून कार्यालयाला कुलूप ठोकले, हे विशेष.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत