शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गावाला वरदान ठरलेला तलाव प्रशासनाकडून दुर्लक्षित

By admin | Updated: May 26, 2017 00:54 IST

पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती.

बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य : गाळाने बुजल्याने साठवण क्षमता घटलीलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : पाच एकर झुडपी जागेवर १९५५ ते १९६१ दरम्यान तत्कालीन सरपंच स्व. मारोतराव झाडे व स्व. रामचंद्र बारस्कर यांनी तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला गावाच्या बाहेरून येणारा लहान नाला जोडला असल्याने वाहून जाणारे पावसाचे पाणी तलावात साठत होते; पण काही वर्षांपासून या तलावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी, बेशरमच्या झुडपांचे साम्राज्य असून तलाव गाळाने बुजला आहे. याकडे लक्ष देत गाळ साफ करून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या दोन स्वर्गीय नेत्यांनी जमिनीत पाणी मुरावे म्हणून या तलावाची निर्मिती केली होती. काही वर्षांपूर्वी बाहेर गावाहून बाजाराला येणारी मंडळी आपल्या बैल व गुरांना या तलावात पाणी पाजत होते. आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. १९८५ ते ९० या काळात असलेले सरपंच रमेश भोयर यांनी या तलावाचे गाळ काढून खोलीकरण केले होते. तलावाच्या मोकळ्या जागेवर झाडे लावण्यात आली होती; पण स्थानिक नागरिकांनी ती झाडे उपडून अतिक्रमण केले आणि जमीन वाहितीत आणली. या बाबीकडे ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी मतदानावर लक्ष ठेवून दुर्लक्ष केले. उलट अतिक्रमणकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. १९५५ ते २००५ पर्यंत या तलावात मत्स्यबीज टाकून मासोळ्या निर्मिती करून याचे कंत्राट दिले जात होते. यातून ग्रामपंचायतीने ५० ते ५५ वर्षांपर्यंत महसुली उत्पन्न घेतले; पण तलावात कुठल्याही सुधारणा केल्या नाही. यामुळेच तलावाची दयनिय अवस्था झाली आहे. सध्या हा तलाव नगर पंचायतच्या अधिनस्त आहे. स्थानिक पदाधिकारी या तलावाच्या सौदर्यीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. २०१२-१३ मध्ये ग्रा.पं. अस्तित्वात असताना तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता शासनाकडून निधी मिळाला होता; पण ग्रा.पं. प्रशासनाने या बाबींवर पैसा खर्च न केल्योन तो शासनाला परत करण्यात आला. सध्या नगर पंचायतीवर आ. कुणावार यांच्या गटाची सत्ता आहे. यामुळे आमदारांनी लक्ष देत या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकण करीत पाणीटंचाईचा प्रश्न कायम मिटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्नही बिकटशहरातील पाणीटंचाई दूर व्हावी, जमिनीत पाणी मुरावे, उन्हाळ्यातही गोपालकांना गुरांना पाणी पाजण्याकरिता भटकावे लागू नये म्हणून १९५५ मध्ये तलावाची निर्मिती करण्यात आली; पण सध्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडला आहे. तलावाच्या सभोवताल शहरातील नागरिक प्रात:विधी उरकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. तलाव व जलपर्णी आणि बेशरम मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.