शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विधान भवनावर लावणार विदर्भाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:52 IST

वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनी कार्यक्रम : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा /हिंगणघाट : वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या अगोदर भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन संपूर्ण कर्ज मुक्ती व उत्पादन खर्च व ५० टक्के ऐवढा हमी भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, आदी आश्वासन त्वरीत पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.वेगळ्या विदर्भाचे आश्वासन व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच विदर्भातून भाजपाचे ४४ आमदार निवडून आले व त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता बसली. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यामध्ये विदर्भाच्या जनतेने भाजपाला प्रचंड साथ दिली; परंतु भाजपाच्या नेत्यांनी मात्र विदर्भाच्या जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भातील जनता भाजपापासून नाराज झाली असून निवडणुकीत भाजपाच्या मतपेटीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांना मरण्यासाठी सरणावर सोडत आहे. भाजपाने निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले होते. त्यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भवादी, शेतकरी, बेरोजगार, व्यापारी सर्वच क्षेत्रातून नाराजीच्या सूर निघत आहे. भाजपाने निवडणुकी अगोदर स्वतंत्र विदर्भाची घोषणा करून विदर्भ राज्याची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा विदर्भातील जनता भाजपाला फटका दिल्या शिवाय राहणार नाही.महाराष्ट्रदिनी यशवंत स्टेडीयम नागपूर येथून दुपारी विदर्भ मार्च निघेल व १ वाजेपर्यंत हा मार्च विधान भवनावर धडक देणार आहे. तेथे विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन होईल. विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. २५ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीची हिंगणघाट तालुका कार्यकर्ता बैठक एपीएमसी हॉलमध्ये पार पडली. त्यांनतर वर्धेतही बैठक झाली. येथे महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर झेंडा लावण्याचे ठरले. या बैठकीत मधु हरणे, रमेश पाटील, संजय चौधरी, पुंडलीक, अभिजीत लाखे, साहेबराव येडे, गणेशपुरे, कैलास घोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रोजगाराचे आश्वासनही खोटेच२ कोटी लोकांना वर्षाला रोजगार देणार म्हणजे ४ वर्षात ८ कोटी लोकांना तर रोजगार मिळालाच नाही उलट नोटबंदी व जीएसटी नंतर उद्योग व व्यापारामध्ये अवकळा आली. ३ लाखांपेक्षा जास्त लहान उद्योग बंद झाले. शहरी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.