शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कडधान्याचे उत्पादन २५ टक्क्यांखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:08 IST

पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम उत्पादनात होणार घट ओल्या दुष्काळाची छाया

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीला पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात थोडासा पाऊस आला. पुढे पाऊस येईल या अपेक्षेने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीनसह मूग व मटकीची पेरणी केली. मात्र, नंतर २५ जुलैपर्यंत पाऊस तर आलाच नाही; पण चक्क उन्हाळा तापला. परिणामी, अल्प ओलाव्याने अंकुरलेले रोपटे करपले. त्यातही काही रोपटी जगली. नंतर आलेल्या पावसाने पिके जोमात बहरली असली तरी मूग, मटकी व तुरीचे पीक खूप विरळ झाले. नंतरच्या काळात विदर्भात कधी मुसळधार तर कधी पावसाची रिपरिप व पाऊस नसेल तेव्हा ढगाळ वातावरण यामुळे मूग, मटकी व तुरीचे पीक बाळसे धरूच शकले नाही. अल्पावधीतील मूग, मटकी या पिकांना माफक शेंगा भराचा व पक्वही झाल्या; पण सततच्या पावसाने जमीन ओली राहिल्याने मटकीच्या पिकाची कापणी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले. तर मुगाच्या शेंगा तोडणीसही मजुरांच्या अभावामुळे व वाढत्या मजुरीमुळे शेंगा झाडावरच फुटल्या. परिणामी, मूग, मटकी पिकाच्या उताऱ्यात घट आली तर दीर्घ पीक असलेल्या तुरीची अवस्था तशीच आहे. आधीच विरळ पडलेले तुरीचे पीक सततच्या पावसाने सखल भागात कारपले तर उंच भागातील झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही तर झाडे खोडही बनले नाही. तसेच शाखाही केल्या नाही. आता ऑक्टोबर महिन्यात शेवऱ्यावर येणाऱ्या तुरीच्या झाडांना किती शेवरा येईल, हे संशयास्पद असल्याने तुरीच्या पिकात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली.पाऊस पुढेही येतच राहणार, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने निंदण व डवरणीची कामे, प्रभावित झाली असून सोयाबीन पिकाची कापणी कशी करावी, हा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावण्याची शक्यता आहे. तर कपाशीची झाडे अजूनही रिकामी आहेत. ओल्या दुष्काळाची शक्यता आता पक्की होत आहे.

टॅग्स :agricultureशेती