शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाने सहकाराच्या घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:13 IST

विदर्भातील सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूतगिरणी यांनी सहकार क्षेत्रात घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला. यापूर्वीच्या सरकारने लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या गरिबीचा व मजबुरीचा फायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या, .....

ठळक मुद्देसुभाष देशमुख : पालिकेच्या भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ

ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : विदर्भातील सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूतगिरणी यांनी सहकार क्षेत्रात घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला. यापूर्वीच्या सरकारने लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या गरिबीचा व मजबुरीचा फायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या, असा घणाघाती आरोप राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केला.गुरूवारी दुपारी ३ वाजता डॉ आंबेडकर चौकात नगर परिषदेद्वारे आयोजित भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प. अध्यक्ष प्रेम बसंतानी, पं.स. सभापती गंगाधर कोल्हे, सिंदी (रेल्वे) चे अध्यक्ष संगीता शेंडे, समुद्रपूरच्या शिला सोनारे व मान्यवर उपस्थित होते.ना. देशमुख पूढे म्हणाले की, शेवटच्या घटकाला समाज प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे. गोरगरीब जनतेला सरकारी योजनांचा फायदा मिळाला पाहिजे. सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आज आपल्या सर्वांचा वनवास खऱ्या अर्थाने संपला आहे. केंद्र, राज्य, जि.प., पं.स., नगर परिषद आदी सर्वच क्षेत्र आपण काबीज केले आहे. त्यामुळे न.प. पदाधिकाऱ्यांनी जनतेला अपेक्षित मुबलक पाणी, गटार योजना, कचरा व्यवस्थापन व मूलभूत सुविधा देण्यासाठी काम केले पाहिजे.खा. तडस, आ.डॉ. भोयर यांनी वर्धा जिल्हा को-आॅ. बँकेच्या घोटाळ्याचा उल्लेख करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. बसंतानी यांनी शासनाकडून शहर विकासासाठी प्राप्त निधी व भविष्यात होणाऱ्या कामांची माहिती दिली. नितीन मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन संजय मानकर व राकेश शर्मा यांनी केले तर आभार चंद्रकांत घुसे यांनी मानले. यावेळी केशव दांडेकर, डॉ. उषा थूटे, वसंत आंबटकर, भूपेंद्र शहाणे, अनिल जोशी, रमेश टपाले, डॉ तुळसकर आदी उपस्थित होते.