घोराड : ग्रामीण भागात जनावरांना उत्तम उपचार मिळावे, गोपालकांना उत्तम सुविधा व्हावी याकरिता शासनाच्यावतीने गावपातळीवर पशुवैद्यकीय दवाखाने तयार केले; मात्र त्यांना इमारतीची योग्य सुविधा पुरविली नसल्याने आज हे दवाखाने कुचकामी ठरत आहेत. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सुकळी (स्टेशन) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. सुकळी (स्टेशन) येथील पशुवैद्यकीय दवाखाना रेल्वे स्थानक मार्गावर गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. या परिसरातील शेतकर्यांजवळ असलेल्या जनावरांना वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने २00४ मध्ये दिनेश सोनटक्के यांच्या मालकीच्या शेतातील १५00 चौरसफुट जागा देत दवाखान्याची इमारत बांधण्यात आली. या जागेवर इमारत बांधून १६ ऑगस्ट २00४ रोजी इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. हा दवाखाना राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत येत आहे. १0 वर्षांच्या कालावधीत या इमारतीला असणार्या तीन पायर्यांना तीस ठिकाणी भेगा पडून त्या अस्ताव्यस्त झाल्या आहेत. इमारतीच्या वर्हांड्याला टाक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून तो तीन फुट खोल दबला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीकडे शासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका बसत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याला स्वतंत्र जागा असणारा सेलू तालुक्यात हा पहिला दवाखाना असल्याची नोंद आहे.(वार्ताहर)
पशुवैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था
By admin | Updated: May 25, 2014 23:46 IST