शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखाने दुपार पाळीत बंद

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

पशुव्यवसायाला चालना देण्याकरिता शासन विविध उपक्रम राबविते. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्याकरिता योजनांच्या माध्यमातून सहाय्य केले जाते. पशुंना योग्यवेळी उपचार मिळावे

घोराड : पशुव्यवसायाला चालना देण्याकरिता शासन विविध उपक्रम राबविते. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्याकरिता योजनांच्या माध्यमातून सहाय्य केले जाते. पशुंना योग्यवेळी उपचार मिळावे म्हणून ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आले. मात्र तालुक्यातील दवाखाने दुपार पाळीत बंद राहत असल्याने पशुपालकांना खासगी दवाखान्यात जावे लागते.जिल्हा परिषद व राज्य सरकार यांच्या माध्यमातून सेलू तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आले. मात्र दुपार पाळीत दवाखाने बंद राहत असल्याने गोपालकांना अखेर खासगी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने हे दवाखाने ओसाड पडलेल्या स्थितीत आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे. सेलू येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात कार्यरत अधिकाऱ्यांची लेटलतिफ सर्वश्रुत आहे. मात्र कारवाईअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मात्र फावते. पशुवैद्यकीय दवाखान्याला एकापेक्षा अधिक गावे जोडण्यात आली असून या दवाखाण्याच्या वेळा ठरविल्या आहे. या वेळा सकाळी ७ ते १२ तर सायंकाळी ४ ते ६ अशी आहेत. सकाळ पाळीत सर्वच दवाखाने अर्धा ते एक तास उशिराने उघडतात. बरेचदा दुपारी दवाखाने उघडे नसतात. यामुळे पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे हे रुग्णालय पशुपालकांकरिता नाममात्र ठरत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना पशुंवर उपचार करुन घेण्याकरिता पैसे खर्च करावे लागतात. यामुळे योजनेचा लाभ होत नाही. ग्रामीण भागातील दवाखाने दुपार पाळीतही सुरू ठेवावे अशी मागणी केली आहे. यामुळे गोपालकांची गैरसोय होणार नाही. या मागणीकडे तालुकास्तरीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)