शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

वीजचोरीच्या माहितीची पडताळणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मीटर वाचकाने रिडींग घेतेवेळी ग्राहकांकडे आढळलेल्या वीजचोरीची माहिती देऊनही त्यापैकी अनेक ग्राहकांवर कारवाई टाळून ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल सादर करण्यात आले आहे, अशा सर्व ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्याचा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व अधिकारी व ...

ठळक मुद्देमहावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून अधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मीटर वाचकाने रिडींग घेतेवेळी ग्राहकांकडे आढळलेल्या वीजचोरीची माहिती देऊनही त्यापैकी अनेक ग्राहकांवर कारवाई टाळून ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल सादर करण्यात आले आहे, अशा सर्व ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्याचा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.अनेक मीटर वाचकांनी ग्राहकांकडे होत असलेल्या वीजचोरीची माहिती स्वयंस्फूर्तीने महावितरणकडे दिली, त्या माहितीची योग्य शहानिशा करण्याच्या सुचना संबंधित अभियंत्यांना देऊनही संबंधित ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल मिळाल्याने अश्या वीज ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फ़त करण्यात येऊन चुकीचा अहवाल देणा-या सर्व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सप्टेबर अखेरपर्यत अशासर्व ग्राहकांची रितसर तपासणी करून योग्य अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करूनही वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकांची त्वरीत पडताळणी करण्याचे आदेशही प्रादेशिक संचालक यांनी दिले आहेत. परिक्षेत्रातील पुनर्जोडणी शुल्काचा भरणा केलेले १६७७६ तर थकबाकीचा भरणा केलेल्या ७३११ ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.अशा प्रत्येक ग्राहकांची पडताळणी सप्टेबर अखेरपर्यंत पुर्ण करण्यात यावी, याशिवाय वाढ़ीव वीज वापराच्या प्रमाणात लघुदाब गैरकृषी वीज विक्री वाढही अपेक्षित असल्याने परिक्षेत्रातील सर्व मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांनी यासाठी प्रयत्न करावेत. एप्रिल ते आॅगस्ट या काळात अकोला आणि वर्धा मंडलातील वीजहानी वाढली असून आकोट, वर्धा आणि कॉग्रेसनगर विभागातील लघुदाब गैरकृषी वीज विक्री ही वाढ़ीव वीज वापराच्या तुलनेत अनुरूप नसल्याबाबतही त्यांनी संबंधित अभियंत्यांची कानउघाडणी केली आहे.थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित होणारसार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडील वीज देयकाच्या वसुलीचे प्रमाण सर्वत्र अत्यल्प असल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरीत खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.आॅगस्ट महिनाअखेर एकूण मीटर वाचनापैकी केवळ ३७ टक्के नोंदीचे प्रमाणीकरण झाले होते ते प्रमाण आता ६५ टक्यापर्यंत झाले असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते १०० टक्के करण्यात यावे, सामान्यपेक्षा ४ पट अधिक आलेल्या वीज बिलांचे १०० टक्के सत्यापन करावे, मंद आणि दोषपूर्ण मीटरच्या बदल्यात लावण्यात आलेल्या मीटरवरील नोंदीनुसार मागील वीज वापराचे योग्य ते मूल्यमापन करणे, त्यांच्या वापराशी सुसंगत देयक संबंधित ग्राहकाला देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.वीजहानी थांबविण्याकरिता प्रयत्नसंपुर्ण परिक्षेत्रातील ११३४ ग्राहक मीटरच्या मार्फ़त वीज वापरत असतांनाही त्यांचे बिल तयार होत नाही. माहिती तंत्रज्ञान विभागातही या ग्राहकांची नोंद नाही. अशा ग्राहकांवर कारवाई करण्याच्या सुचनाही खंडाईत यांनी केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात अधिक हानी असलेल्या शहरांची वीजहानी कमी कराण्यासाठीचे नियोजन तसेच शहरी भागातील पायाभूत सुविधांचे मजबूतीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करा. सोबतच जिल्हा मुख्यालयांच्या सुशोभीकरणाच्या कामांचे अंदाजपत्रकासोबतच वन क्षेत्रातील दुर्घटना टाळण्यासाठी योग्य अंदाजपत्रक त्वरीत तयार करण्याच्या सुचनाही भालचंद्र खंडाईत यांनी केल्या आहेत.विविध जबाबदाऱ्या निश्चित कराबिल दुरुस्ती किंवा ग्राहकांना दिल्या जाणाºया जमा रकमेच्या एकूण देयकांची रक्कम ही त्या महिन्याच्या एकूण मागणीच्या १ टक्यापेक्षा अधिक नसावी. विविध स्तरांवर सर्व प्रलंबित बिल दुरुस्ती, बिल पुनरावृत्ती आदीचे प्रमाण बंद करण्यात यावेत. बिल दुरुस्ती प्रकरणांची तपासणी करताना चुकीच्या दुरुस्त्या, क्रेडिट बिल्स आदीची जबाबदारी निश्चित करण्याच्या सुचनाही करण्यात आल्या.