शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अन् विक्रेत्याने फेकली पोलिसांच्या अंगावर दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:01 IST

दारूविक्रत्यांच्या घरावर धाड मारून कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांच्या अंगावर दारू फेकल्याचा प्रकार गुरुवारी रात्री सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मांडवगड येथे घडली.

ठळक मुद्देमांडवगड येथील प्रकार : बाप लेकांना अटक; असे प्रकार नेहमीच घडतात, दोष कुणाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दारूविक्रत्यांच्या घरावर धाड मारून कारवाई करणाºया पोलीस कर्मचाºयांच्या अंगावर दारू फेकल्याचा प्रकार गुरुवारी रात्री सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मांडवगड येथे घडली. या दारू विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींची नावे भीमराव येसनकर आणि नितीन भीमराव येसनकर अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जात आहे. शहरालगतच्या गावखेड्यात गावठी दारू विक्रीचा पूर आला आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांडवगड येथे दारूचे पाट वाहत असल्याची ओरड आहे. या विक्रीला येथील पोलीस कर्मचाºयांचेच पाठबळ असल्याचे गावकºयांकडून सांगण्यात येत आहे. येथील काही दारू विक्रेत्यांवर कधीच कारवाई होत नसल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले आहे. या दारूविक्रीला आळा घालण्याकरिता गुरुवारी रात्री विजय उमरे आणि प्रमोद शेळके नामक पोलीस कर्मचारी कारवाई करण्याकरिता गेले. त्यांनी गावात माहिती घेतली असता खबºयाकडून येथील भीमराव येसनकर याच्या घरी मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन येसनकरच्या घरावर धाड घातली असता भीमराव व त्यांचा मुलगा नितीन येसनकर याने पोलिसांच्या अंगावर दारू फेकून पळ काढला. या प्रकरणी विजय उमरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भीमराव आणि नितीन येसनकर या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. असे नेहमीच घडत असल्याने यात नेमका दोष कोणाचा याचा शोध गरजेचा आहे.दारूबंदीच्या कायद्यात अनेक बदल, तरीही विक्री सुरूचदारूबंदी कडक करण्याकरिता काही कायद्यात बदल करण्यात आले आहे. त्या कायद्यानुसार जिल्ह्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दारूबंदी करणाºयांना तडीपार करण्याचे अनेक प्रकरणे आहेत. नव्या अनेक प्रकरणात अनेकांवर या कायद्यानुसार कारवाईचे अनेक प्रस्ताव तयार आहेत. तरीही जिल्ह्यात दारू विक्री सुरूच आहे.कारवाईदरम्यान पैशाची मागणी ?दारूविक्रेत्याच्या घरी गेलेले पोलीस कर्मचारी विक्रेत्याला पैसे मागत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातही तसे झाले असावे अशी चर्चा गावात आहे. यामुळेच दारू विक्रेत्याने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.